आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसीबीचा छापा:ठाकरे गटाच्या भोईरांच्या घरावर एसीबीचा छापा

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्या घरावर आणि कार्यालयावर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी छापा टाकला. त्यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी त्याच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा सुमारे ४४१ टक्के जास्त संपत्ती जमा केली आहे. एसीबीचे म्हणणे आहे की, भोईर यांनी बेकायदेशीरपणे ८५ लाख रुपयांची संपत्ती मिळवली आहे.

होळी सणाच्या दिवशी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भोईर यांच्या घरावर एसीबीने छापा टाकल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. याआधी दिवाळीत त्याच्यावर २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट-११ ने भोईर यांना अटक केली होती. अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्यांची जामिनावर सुटका झाली. ठाकरे गट सोडण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाकडून दबाव आणल्याचा आरोप भोईर यांनी त्या वेळी केला होता. मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी आपले संघटन वाढवण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे अशा प्रकारचा डाव अवलंबत असल्याचे जाणकार सूत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान, आता त्यांच्यावर धाड पडल्यानंतर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...