आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इनसाइट:एसीबीला 5 वर्षांत केवळ सरासरी 4%  प्रकरणांतच सिद्ध करता आले आरोप

विनोद यादव | मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नव्या लोकायुक्तांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे अधिकार देण्याचे शिंदे-फडणवीस सरकारचे सूतोवाच; पण...

राज्य सरकारने नवा लोकायुक्त कायदा विधेयक मांडण्याची घोषणा केली. यानुसार लोकायुक्तांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे अधिकारही मिळतील. तथापि, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नोंदवलेल्या गुन्ह्यांपैकी गेल्या पाच वर्षांत न्यायालयात केवळ सरासरी ४.३४% प्रकरणांतच आरोप सिद्ध करता आले. या पार्श्वभूमीवर नव्या कायद्याने राज्याला किती फायदा होईल, याबद्दल साशंकता व्यक्त आहे. विशेष म्हणजे या वर्षी जानेवारी ते १६ डिसेंबरपर्यंत एसीबीने ७१३ प्रकरणे नोंदवली. त्यापैकी केवळ ४.०७% प्रकरणांतच काेर्टात आरोप सिद्ध करता आले. एसीबीकडून दरवर्षी नोंदवल्या जाणाऱ्या एकूण खटल्यांपैकी ९० टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये ते कोर्टात आरोप सिद्ध करू शकले नाही.

५ वर्षांत एसीबीने काेर्टात सिद्ध केलेल्या आरोपांवर दृष्टिक्षेप
तपशील 2017 2018 2019 2020 2021
एकूण नोंद गुन्हे 925 936 891 663 773
आरोपपत्र दाखल 888 868 696 466 372
दोषसिद्ध प्रकरणे 54 56 54 10 18
दोषसिद्ध आरोपी 62 75 65 14 19
दोषसिद्ध प्रकरणे 5.84% 5.98% 6.06% 1.51% 2.33%

बातम्या आणखी आहेत...