आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईडीच्या नावाने खंडणी वसूल केल्याचा आरोप:जितेंद्र नवलानीविरोधात एसीबीची लुकआऊट नोटीस, परदेशात फरार झाल्याचा संशय

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्यवसायिक जितेंद्र नवलानी यांच्याविरोधात महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लुकआऊट नोटीस जारी केले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ईडी अधिकारी असलेले नवलानी व्यवसायिकांकडून खंडणी वसूल करत असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर एसीबीने नवलानीविरोधात गुन्हा दाखल करत तपासाला सुरूवात केली होती.

नवलानीने ईडी अधिकाऱ्यांच्या नावाने सुमारे 59 कोटी रुपये उकळल्याचे एसीबीच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यानंतर आता नवलानी परदेशात फरार झाल्याचा संशय एसीबीला आहे. त्यामुळे नवलानीविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

संजय राऊत यांनी केले होते गंभीर आरोप
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत ईडीचे काही अधिकारी खंडणी रॅकेट चालवत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यात व्यवसायिक जितेंद्र नवलानी यांचे नाव होते. याप्रकरणी प्रथम मुंबई पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. मात्र, नंतर हे प्रकरण एसीबीकडे सोपवण्यात आले. या प्रकरणाचा तपास केला असता ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून 2015 ते 2021दरम्यान नवलानीने 58 कोटी 96 लाख 46 हजार रुपये वसुल केल्याचे एसीबीच्या लक्षात आले होते. या रकमा नवलानी याने स्वतःच्या नावाने, तसेच बनावट शेल कंपन्यांच्या नावाने असुरक्षित कर्ज व सल्लागार शुल्क या स्वरूपात घेतली होती. त्यानंतर याप्रकरणी नवालानीविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 कलम 8 व कलम 7(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात आता लुक आऊट नोटीस जारी केल्याने नवलानींच्या अडचणीत वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...