आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • ACB's Open Inquiry Ordered Against Former Mumbai Commissioner, A Police Inspector Accused Of Demanding Bribe Of 2 Crores; News And Live Updates

परमबीर सिंहच्या अडचणीत वाढ:मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांविरोधात एसीबीला मुक्त चौकशीचे आदेश, एका पोलिस निरीक्षकाने 2 कोटी लाच मागितल्याचा केला होता आरोप

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परमबीर सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन तत्कालीन गृहमंत्र्यांना अडचणीत आणले होते

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) मुक्त चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस निरीक्षक अनूप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. त्यासोबतच सिंह यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे अनेक गंभीर आरोप कले होते.

त्यावरुन राज्य सरकारने संबंधित प्रकरणातील भ्रष्ट्राचाराचा तपास करण्यासाठी मुक्त चौकशीचे आदेश दिले आहेत. अनूप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्या या मागणीसंदर्भांत अतिरिक्त मुख्य सचिव सिंग (गृह विभाग) यांना पत्र लिहले होते. त्यानंतर काही दिवसांनी गृह विभागाने डांगे यांना पुन्हा कामावर रुजू केले.

माजी गृहमंत्र्यांवर लावले होते वसूलीचे आरोप
परमबीर सिंह यांनी आपल्यावर केलेल्या आरोपाचे खंडन केले होते. तत्पुर्वी, गृहविभागाने तक्राराच्या आधारावर चौकशीचे आदेश दिले होते. परंतु, परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहित माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर महिन्याला 100 कोटी रुपये वसूलीचे आरोप केले होते. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर माजी गृहमंत्री देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सादर केला होता.

परमबीर यांच्याविरोधात ही दुसरी चौकशी
राज्य सरकारने परमबीर सिंह यांच्याविरोधात दुसऱ्यांदा चौकशीचे आदेश दिले आहेत. यापूर्वी अँटिलिया प्रकरणातील तपासात अपयशी ठरल्याच्या आरोपावरुन गृह विभागाने सिंह यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. सिंह यांना मुंबईच्या पोलिस आयुक्त पदावरुन 17 मार्च रोजी हटवण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...