आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाळी पर्यटनस्थळ:पावसाळ्याच्या तयारीला वेग, माळशेज घाटामध्ये दरडींवर जाळीचे आच्छादन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

असा आहे घाट : घाटातील बोगद्यापर्यंतचा भाग पुणे जिल्हा हद्दीत, तर पुढचा भाग ठाणे जिल्ह्याच्या हद्दीत, पावसाळ्यापूर्वी दुरुस्तीचे काम

222 राष्ट्रीय महामार्गावरील घाट

126 किलोमीटर नगरपासून अंतर

09 किमी घाटाची लांबी अंदाजे

मान्सून महिनाभरात दाखल होईलच. तत्पूर्वी पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून परिचित असलेल्या अन् पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माळशेज घाटात पावसाळापूर्व कामाला गती देण्यात आली आहे. दरवर्षी दरड कोसळून घाटमार्गात अडथळे निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर डोंगरकपारीत जाळी बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे असून जीव धोक्यात घालून काम करताना कर्मचारी दिसत आहेत.

बातम्या आणखी आहेत...