आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांवर काळाने घाला घातला:एकाच कुटुंबातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू; तीन जण गंभीर जखमी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवासाठी कोकणातील गावाकडे जाणाऱ्या गणेश भक्तांवर काळाने घाला घातला आहे. कार आणि शिवशाही बसच्या धडकेत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तीन जण गंभीर जखमी आहेत. पोलादपूरजवळ हा भीषण अपघात घडल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या आनंद पार्क परिसरात जयवंत सावंत हे त्यांच्या कुटुंबासह वास्तव्याला होते. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या त्यांच्या मूळगावी गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी सावंत कुटुंबीय आज सकाळी रवाना झाले होते. सकाळी चारच्या सुमारास सावंत कुटुंब अंबरनाथहून रवाना झाले आणि काही तासातच पोलादपूरजवळ त्यांच्या कारची शिवशाही बससोबत धडक झाली.

प्रकृती चिंताजनक

या अपघातात कारमधील जयवंत सावंत (60), किरण घागे (28) या दोघांचा मृत्यू झाला. तर गिरीश सावंत (34), जयश्री सावंत (56) आणि अमित भीतळे (30) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या तिघांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

बीडमध्येही भीषण अपघात

दरम्यान, आज सकाळी मराठवाड्यातील बीडमध्ये देखील भीषण अपघात झाला आहे. दोन कार समोरासमोर धडकल्याने एक महिला पोलिस अधिकारी अन् त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलाचे जागीच मृत्यू झाले आहे. बीडच्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...