आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:लाॅकडाऊनमध्ये 456 मजुरांचा अपघाती मृत्यू, कोरोना बळींच्या तुलनेत 15 टक्के अपघातांचे अधिक बळी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबादजवळ एका मालगाडीने  गावी परतणाऱ्या मजुरांना चिरडले होते, यात 16 जणांचा मृत्यू झाला होता - Divya Marathi
औरंगाबादजवळ एका मालगाडीने गावी परतणाऱ्या मजुरांना चिरडले होते, यात 16 जणांचा मृत्यू झाला होता
  • अपघातात देशात उत्तर प्रदेश पहिले तर महाराष्ट्र ठरले चौथे राज्य

आपल्या मूळ गावी परतु इच्छिणाऱ्या मजुर व प्रवाशांचे लाॅकडाऊन काळात विविध राज्यात तब्बल १ हजार २५३ अपघात झाले असून त्यामध्ये ४५६ मजुरांचा बळी गेल्याची माहिती ‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ या रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने जाहीर केली आहे.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्च पासून देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला. सध्या या लाॅकडाऊनचे चौथे चरण चालु आहे. या काळात रेल्वे व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे. त्यामुळे रोजगारासाठी परप्रांतात गेलेल्या मजुरांनी मिळेल त्या वाहनांनी किंवा पायी आपले मूळ गाव गाठण्याचा प्रयत्न केला.

या काळात १२५३ रस्ते अपघात झाले असून त्यात ४५६ बळी गेले तर ९३० लोक जखमी झाले आहेत. त्यामध्ये स्थलांतरीत बळींची संख्या १८० असून ६९४ जखमी आहेत. अत्यावश्यक सेवेतील ३० कर्मचारी मृत्यु पावले असून २६ जखमी आहेत. तर २४६ प्रवासी अपघाताचे बळी असून २१० जखमी आहेत. सर्वाधिक अपघात उत्तर प्रदेशात झाले आहेत. तेथे लाॅकडाऊन काळात १४४ मजूर व प्रवाशी अपघातात बळी गेले आहेत. मध्य प्रदेशात ४४, तेलंगणामध्ये ३७, महाराष्ट्रात २५ आणि पंजाब राज्यात २४ प्रवासी मजुरांचा अपघातात बळी गेला आहे.

बिहारमध्ये अपघात १८ ठार: 

बिहारमध्ये झालेल्या अपघातात १८, आंध्र प्रदेश १५, झारखंड १५, हिमाचल प्रदेश १३ आणि कर्नाटकात झालेल्या अपघातात १३ प्रवासी व मजुर मृत्युमुखी पडले आहेत. केरळ (८) आणि पश्चिम बंगलामध्ये (४) मृत्यु लाॅकडाऊन काळातील अपघातात झाले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...