आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीरामपूर शहरातील बँक परिसरातील दुर्घटना:चुकून सुटलेली गोळी शरीरातून आरपार, मृत्यू

श्रीरामपूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुरक्षा रक्षक रायफल खांद्याला लावत असताना अचानक रायफलमधून गोळी सुटली. ही गोळी बँकेत कामकाजासाठी आलेल्या एकाच्या डोक्यात घुसून त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी शहरातील जिल्हा बँकेच्या शाखेत घडली. अजित विजय जोशी (४२ रा. दत्त मंदिराजवळ, वाॅर्ड नं. ७, श्रीरामपूर) असे मृताचे नाव आहे.

अजित जोशी हे शिवाजी रोडवरील जिल्हा बँकेच्या शाखेत कामानिमित्त आले होते. त्याचवेळी अशोक कारखान्याचे काही कर्मचारी सुरक्षा रक्षक दशरथ कारभारी पुजारी (५७ ) यांच्यासह पैसे भरण्यासाठी आले होते. त्यावेळी सुरक्षा रक्षक पुजारी हे रायफल खांद्याला लावत असताना त्यांच्या रायफलमधून गोळी सुटली. त्याचवेळी बँकेसमोर आलेले जोशी यांच्या ती डोक्यातून आरपार गेली. यात ते जागीच ठार झाले. उपअधीक्षक संदीप मिटके, शहर ठाण्याचे निरीक्षक संजय सानप घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकेतून जोशी यांचा मृतदेह साखर कामगार रुग्णालयात नेला.

बातम्या आणखी आहेत...