आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खडसेंना कोरोना झालाच नाही:एकनाथ खडसेंना डिस्चार्ज! कालच खडसेंची अँटिजेन रिपोर्ट निगेटिव्ह आली होती पण, फुफुसांत संसर्ग दिसल्याने ते मुंबईला कोरोनाच्या उपचारासाठी गेले होते

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काल ट्विट करून सांगितले कोरोना झाला, आज रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने डिस्चार्ज- मीडिया रिपोर्ट

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती होती. यासंदर्भात खडसेंनी ट्विटही केले होते. मात्र आता त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे वृत्त आहे. कोरोनाची लागण झाल्यामुळे एकनाथ खडसे मुंबईमध्ये दाखल झाले आणि उपचारासाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे अशी माहिती टीव्ही नाइन या वृत्तवाहिनीने दिली आहे.

कोरोना रिपोर्ट निगेटिव्हविषयी सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी एकनाथ खडसे यांची अँटिजेन टेस्ट केली होती. जळगावमध्ये ही टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र यानंतर, सीटी स्कॅनमध्ये त्यांच्या फुफुसांत संसर्ग दिसून आला होता. त्यामुळे कोरोनाच्या पुढील उपचारासाठी त्यांना मुंबईला हलवण्यात आले होते. त्या ठिकाणी आज त्यांची आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आली. ही टेस्ट आता मीडिया रिपोर्टनुसार निगेटिव्ह आली आहे. खडसे किंवा डॉक्टरांनी अद्याप या वृत्तास अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार, एकनाथ खडसे यांचे मुंबईत तपासणी केल्यानंतर दोन्हीही रिपोर्ट निगेटिव्ह आले. यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज सकाळी 10 वाजता त्यांना रुटीन चेकअपसाठी बोलावण्यात आले होते. दरम्यान एकनाथ खडसे यांनी काल (गुरुवारी) ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. 'माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. गत 6 दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची Covid चाचणी करून घ्यावी हि विनंती. पुढील उपचारासाठी मी मुंबईला रवाना होत आहे. तुम्हा सर्वांच्या सदिच्छा माझ्या सोबत असल्याने मी लवकरच बरा होऊन पुन्हा आपल्या सेवेत असेल.'

बातम्या आणखी आहेत...