आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाद:मुंबईमध्ये पोलिस शिपायाशी वाद घालत धक्काबुक्की करणाऱ्या आरोपीला अटक

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस शिपायाशी वाद घालून धक्काबुक्की करणाऱ्या शुभम वीरेंद्र मिश्रा या २६ वर्षीय तरुणाला ओशिवरा पोलिसांनी अटक केली आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदार विशाल नाईक हे ओशिवरा पोलिस ठाण्यात पोलिस शिपाई म्हणून काम करतात. जोगेश्वरीतील आदर्शनगर परिसरात काही तरुणांमध्ये भांडण सुरू असल्याने पोलिस तिथे पोहोचले. पोलिस ठाण्यात घेऊन जात असताना मिश्रा याने पोलिसांशी हुज्जत घालत भांडण करण्यास सुरुवात केली.

बातम्या आणखी आहेत...