आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Accused On Mumbai Police : Rape Victim Committed Suicide In Nalasopara, Mother Said Police Was Asking The Camel Kite Question So This Step Was Taken

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई पोलिसांवर आरोप:बलात्कार पीडितेची नालासोपाऱ्यात आत्महत्या, पोलिसांनी उलट-सुलट प्रश्न विचारल्यामुळे मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आईचा आरोप

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19 सप्टेंबर रोजी पीडितेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, त्यानंतर आरोपीला दोन दिवसांत अटक

मुंबईतील नालासोपारा येथे एक बलात्कार पीडित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली. पोलिसांमुळे महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा पीडितेच्या आईचा आरोप आहे. तपास करणारे पोलिस तिला बलात्काराबद्दल उलट-सुलट प्रश्न विचारत होते. यामुळे ती हतबल झाली, असे आईचे म्हणणे आहे.

लग्नाचे आमिष देऊन आरोपी पीडितेवर करायचा बलात्कार

19 सप्टेंबर रोजी पीडितेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. त्याच्या दोन दिवसांनंतर आरोपीला अटक देखील करण्यात आली होती. आरोपीने लग्नाचे आमिष देऊन पीडितेवर वारंवार बलात्कार केला होता. दरम्यान या घटनेनंतर मृत युवतीची सुसाइड नोटही समोर आली असून, त्यामध्ये पोलिसांवर कोणताही आरोप करण्यात आला नाही.

पोलिस ठाण्याबाहेर कुटुंबीयांची निदर्शने

रविवारी झालेल्या मुलीच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबांनी पोलिस ठाण्याबाहेर गोंधळ घातला आणि यास जबाबदार पोलिस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याची मागणी केली. यादरम्यान त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या पुतळ्याचे दहन देखील केले.

तपासासाठी टीम गठीत केली

पीडितेच्या आईने केलेल्या आरोपांनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले आहेत. एसपी पातळीवरील उप-अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतील. तपासात कोणी पोलिस दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबाला दिले आहे.

बातम्या आणखी आहेत...