आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:शिवराज्याभिषेकदिनी जि.प., ग्रामपंचायतींवर भगवी गुढी, राज्यभरात 6 जून शिवराज्य दिन म्हणून होणार साजरा

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा ६ जून हा राज्याभिषेक दिन संपूर्ण महाराष्ट्रात यंदापासून शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर भगवी गुढी उभारण्यात येणार असून महाराष्ट्र गीतापासून शिवरायांच्या आदेशपत्राचे जाहीर वाचन होईल.

राज्याच्या ग्रामविकास विभागातर्फे हा अनोखा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या संदर्भात राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ६ जूनला राज्याभिषेक दिन हा शिवराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा संकल्प आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहाने साजरा व्हावा या दृष्टीने ग्रामविकास विभाग हे पाऊल उचलणार आहे. आतापर्यंत शिवराज्याभिषेक दिन रायगडावर साजरा व्हायचा, पण आता हा दिन राज्यभर साजरा करण्याची योजना आहे.

आचारसंहितेचा अडसर
राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता आहे. त्यामुळे याबाबतचा अधिकृत निर्णय जाहीर केला जाणार नाही. पण आचारसंहिता संपल्यावर हा निर्णय जाहीर करता येईल. या दिवशी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर गुढी उभारण्यात येईल. शिवरायांना अभिवादन केले जाईल. त्याशिवाय महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत गायले जाईल

बातम्या आणखी आहेत...