आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून (ड्रंक अँड ड्राइव्ह)वाहने चालवल्याप्रकरणी मुंबई आणि ठाणे पोलिसांनी एकूण ८१५ जणांवcर कारवाई केली अाहे. यात ठाणे पाेलिसांनी तब्बल ६५९ जणांवर कारवाई केली असून मुंबई पोलिसांना अवघे १५६ जण सापडले आहेत. ठाण्याचे पोलिस उपायुक्त (वाहतूक) विनयकुमार राठोड यांनी सांगितले की, ३० डिसेंबर रोजी २३३ आणि ३१ डिसें ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत २७० जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यातील ४५७ जणांविरुद्ध मोटर वाहन कायद्याच्या कलम १८५ नुसार कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी एकूण १५६ जणांविरुद्ध मद्यपान करून वाहन चालवल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरला सायंकाळपासून १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत मुंबई शहरात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कायदा व सुव्यवस्थेसाठी ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी व अधिकाऱ्यांची तैनाती करण्यात आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.