आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यपालांच्या वक्तव्यावरुन राज्यात संताप आहे, यावरील लक्ष विचलीत करण्यासाठीच संजय राऊतांवर कारवाई केली जात आहे. राऊतांवरील कारवाई म्हणजे केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर, मुजोरी आणि माज आहे. कारवाईनंतर बंडखोरांतील काही लोक उन्माद अन् आनंद व्यक्त करीत आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार मिटकरी यांनी केली.
राऊतांनी एकहाती किल्ला लढवला
मिटकरी म्हणाले, हे अपेक्षितच होते. अनेक दिवसांपासून भाजपने साम, दाम, दंड, भेद दाखवून भाजपने ईडीचा धाक दाखवत शरण आणले. संजय राऊत प्रामाणिक शिवसैनिक असून उद्धव ठाकरेंसोबत एकहाती किल्ला लढवला.
संजय राऊत निष्ठावंत
मिटकरी म्हणाले, संजय राऊत कडवे शिवसैनिक आणि बाळासाहेबांचे निष्ठावंत आहेत की, त्यांनी सेना सोडली नाही, भाजपला शरण गेले नाहीत. संजय राऊतांवरील कारवाईमुळे बंडखोरांतील काही लोक उन्माद आणि आनंद व्यक्त करीत आहेत. शासकीय यंत्रणेचा भाजपने वापर करुन त्यांनी शिवसेनेचे बंडखोर त्यांच्याकडे ओढले याला राऊत अपवाद होते. गत अनेक दिवसांपासून त्यांना अडचणीत आणले जात हेते.
इतिहास दखल घेईल
मिटकरी म्हणाले, सोमय्यासारख्या अनेक लोकांना आनंद झाला असेल पण महाराष्ट्र ही घटना आज अधोरेखित करेल की, संजय राऊतांनी एकहाती लढा देत दबावाला बळी पडले नाहीत. याची इतिहासात दखल घेतली जाईल. आमचा पक्ष शिवसेनेच्या, उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. अडचणी निर्माण होत असतील तर आम्ही भीक घालणार नाही. आम्ही संजय राऊतांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या खऱ्या शिवसेनेसोबत आहोत.
अंगणवाडीतील लोकही सांगतील..
मिटकरी म्हणाले, कारवाया सुड भावनेने होत आहे, हे अंगणवाडीतील लोकही सांगत आहेत. प्रताप सरनाईक, जाधवांकडे संपत्ती सापडली असे अनेक लोक ईडीच्या धाकाने भाजपमध्ये गेले. त्यांच्यावर ईडीचा ससेमिरा लावला जातो. ईडी म्हणजे शासकीय यंत्रणेचा गैरवापर आहे. आमचे राष्ट्रवादीचे देशमुख आणि मलिक लढा देत आहेत ते घाबरले नाहीत. संजय राऊतांनीही तशाच प्रकारे काम करीत आहेत.
मुजोरी आणि माज
मिटकरी म्हणाले, केंद्रीय यंत्रणेचा गैरवापर, मुजोरी आणि माज सुरु आहे. राज्यपालांविरोधातील रोष विचलीत करण्यासाठी संजय राऊतांवर आजच ईडीकडून करण्यात आली. राज्यपालांना उत्तराखंडमध्ये परत पाठवले जाणार आहेत त्याधर्तीवर संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे.
तपासयंत्रणेला अधिकार- अजित पवार
ईडी ही स्वायत्त संस्था त्यांना चौकशीचा अधिकार आहे. सर्व वेगवेगळ्या विभागात काही तक्रारी असेल तर चौकशीचा अधिकार तपास यंत्रणेला आहे. नेमके नक्की काय झाले, राऊत हेच सांगतील. देशाच्या कुठल्याही व्यक्तिचा चौकशी करण्याचा अधिकार असल्याचा त्यांनी पुन्हा उच्चार केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.