आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Sanjay Raut Ed Enquiry Latets Update | Action Against Sanjay Raut, Shinde Group, Anandotsav In BJP; Feeling That BJP, Shinde Group Is Acting Out Of Revenge

ईडीघात:राऊतांवरील कारवाईने शिंदे गट, भाजपत आनंदोत्सव; भाजप, शिंदे गट सूडभावनेतून वागत असल्याची भावना

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेचे राज्यसभा सदस्य खासदार संजय राऊत यांना सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ताब्यात घेल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी शिंदे गटाने सावध प्रतिक्रिया दिल्या असल्या तरी भाजपच्या नेत्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे. राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएम अशा विविध राजकीय पक्षनेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ईडीच्या गैरवापराबाबत लोकसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले.

ईडीने रविवारी सकाळी सातपासून सुमारे ९ तास राऊत यांची
त्यांच्या भांडूप येथील ‘मैत्री’ या निवासस्थानी चौकशी केल्यानंतर ताब्यात घेतले. त्यांना ईडी कार्यालयात नेले जात असताना शिवसैनिकांनी कुठल्याही स्थितीत संजय राऊत यांना ईडीला बाहेर नेऊ देणार नाही, असा पवित्रा घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.
संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन कल्यानंतर राऊत ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले.

हे इंग्रजांचे धोरण : पटोले
आमच्याविरोधात जो बोलेल त्याच्यावर कारवाई करू, अशा इंग्रजांनी आणलेल्या धोरणाची अंमलबजावणी भाजप सरकार करत आहे. संजय राऊत यांच्यावर झालेली कारवाई नवीन नाही. त्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी ती सुरू आहे. अजून किती लोकांना जेलमध्ये टाकायचे हे त्यांनी ठरवावे. परंतु लोकशाहीला ते सोप्या पद्धतीने हलवू शकणार नाहीत.

ईडी केंद्राची गुलाम : सावंत
“ती ईडी नाही तर केंद्र सरकारची गुलाम आहे. विरोधकांना ठरवून टार्गेट केलें जात आहे. राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली, असा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

लोकसभेत ईडीचा मुद्दा उपस्थित करू : सुप्रिया सुळे
तपास यंत्रणेला सहकार्य करणे आपली नैतिक जबाबदारी आहे. संजय राऊत ईडी चौकशीला सहकार्य करतील असा विश्वास आहे. पण कुणावर अन्याय होणार नाही याची खबरदारी सरकारने घ्यावी. ईडीचा मुद्दा संसदेत उपस्थित करू, असे खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले.

कारवाईशी आमचा संबंध नाही : दीपक केसरकर
ही कारवाई ईडीकडील पुराव्यांवरून होत आहे. त्यामुळे त्यांचा आणि आमचा संबंध नाही. मुद्दाम असे गैरसमाज पसरवले जात आहेत. अमित शाह यांच्या भेटीशी आणि राऊत यांच्यावर होणारी कारवाई यांचा देखील संबंध नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...