आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कृषी विद्यापीठ:विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड 19 चा उल्लेख नसेल, असे असल्यास कारवाई करणार - कृषीमंत्री दादाजी भुसे 

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड 19 असा उल्लेख केलेल्या प्रकरणाची राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात राज्य  शासनाचे कुठलेही आदेश नसताना तसा उल्लेख  करण्याचा आदेश देणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश कृषिमंत्री भुसे यांनी महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेला दिले आहेत.

यासंदर्भात महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्या महासंचालकांना व सर्व कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठविलेल्या पत्रात कृषिमंत्र्यांनी म्हटले आहे की, कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोविड 19 चा उल्लेख शासन आदेश नसतानाही करण्यात आला आहे. असा उल्लेख करण्याचा आदेश देणाऱ्या संबंधितांची चौकशी करून  कारवाई करण्यात यावी व त्याबाबतचा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश या पत्रात दिले आहेत.

दरम्यान राज्यातील कृषी पदविका आणि तंत्र निकेतन अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा देखील कोरोना काळात रद्द करण्यात आल्या. कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. या विद्यार्थ्यांना आता गेल्या वर्षभरातील अंतर्गत गुणांचे मूल्यमापन आणि गेल्या दोन वर्षातील गुणांची सरासरीनुसार उत्तीर्ण केले जाईल. राज्यातील 230 कृषी विद्यालयातील दहा हजार विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.