आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई सायबर पोलिसांची कारवाई:मोबाइलद्वारे ऑनलाइन इन्स्टंट लोन रॅकेटप्रकरणी 14 अटकेत

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाइल फोन अ‍ॅपच्या माध्यमातून इन्स्टंट लोन देण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक तसेच कर्ज वसूल करताना छळ करणाऱ्या रॅकेटमधील १४ जणांना मुंबईच्या सायबर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी १४ कोटी रुपये आणि २.१७ लाख अमेरिकन डॉलर एवढ्या रकमेची क्रिप्टोकरन्सी असलेली ३५० बँक खाती गोठवली आहेत. गुन्हे शाखेचे संयुक्त आयुक्त सुहास वारके यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

वारके यांनी सांगितले की, ‘या वर्षी मे महिन्यात यासंदर्भात एक तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर झालेल्या चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्याने अटकेची कारवाई करण्यात आली. मोबाइल फोन अ‍ॅपद्वारे इन्स्टंट लोनसाठी अर्ज करताना अर्जदाराचा सर्व वैयक्तिक डेटा आरोपींच्या कंपनीकडे जात असे. कर्जाची परतफेड करू न शकलेल्या लोकांचा डेटा आरोपींच्या कंपनीकडे जात असे. कर्जफेड करू न शकलेल्या किंवा व्याजही भरू न शकलेल्या लोकांचे माॅर्फ केलेले अश्लील फोटो त्यांच्या मित्रांमध्ये आणि कुटुंबीयांत फिरवण्याचा उद्योग हे आरोपी करत असत.

बातम्या आणखी आहेत...