आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद हा तापलेला आहे. दरम्यान आता एक मोठी बातमी समोर येतेय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण चिवला बीचवरील नीलरत्न बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाकडून हे आदेश देण्यात आले आहेत.
एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने नारायण राणेंच्या मालवण येथील निलरत्न बंगला बांधत असताना सीआरझेड 2 चे उल्लंघन झाले असल्याची तक्रार ऑगस्ट 2021 ला केली होती. यानंतर तक्रारीची कॉपी आपल्याला मिळाल्याची माहिती अधिकार कार्यकर्त्याने दिली आहे. भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान नारायण राणेंच्या अधीश बंगल्याच्या पाहणीचा वाद ताजाच आहे. असे असताना निलरत्न बंगल्यावर देखील कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.
नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद हा दिवसेंदिवस वाढच चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचे घोटाळे बाहेर काढणार असल्याचे भाजपकडून वारंवार सांगितले जात आहे. यावरून शिवसेनाही सडेतोड उत्तर देताना दिसत आहे. यामुळे आता या कारवाईनंतर नारायण राणे याबद्दल काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.