आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात सरकारवर आरोप:'भारत बंद'चे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यास कारवाई केली जाणार; काँग्रेस खासदार राजीव सातव यांचा सरकारवर निशाणा

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गुजरातमध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य नाही का? राजीव सातव यांचा सवाल

केंद्र सरकारने आणलेल्या तिन्ही कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आज (मंगळवार 8 डिसेंबर) भारत बंदची हाक दिली आहे. देशभरातील शेतकऱ्यांसह अनेक संघटना, विरोधी पक्षांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून गुजरातमध्ये बंद पाळण्यात येत असून त्याला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान गुजरात सरकार लोकशाही अधिकारांचा वापर करणाऱ्यांना अटक करण्याची धमकी देत असल्याचा आरोप काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केला आहे.

राजीव सातव यांनी सोशल मीडियावर एक पत्रक पोस्ट केले आहे. या पत्रकामध्ये भारत बंदचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा आदेश दिला आहे. पत्रकावरून सातव यांनी सरकारवर निशाणा साधला. लोकशाही हक्कांचा वापर करण्याचे धाडस करणाऱ्या कोणालाही अटक करण्याची धमकी आता गुजरात सरकार देत आहे. असा आरोप सातव यांनी केला. तसेच गुजरातमध्ये बोलण्याचे स्वातंत्र्य नाही का? असा सवालही सातव यांनी केला आहे.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser