आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्‍या रुग्णसंख्‍येत वाढ:​​​राज्यात एकाच दिवसात 711 नवे बाधित, चौघांचा मृत्यू; मात्र घाबरण्याचे कारण नाही!

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत ४,३४९ खाटांपैकी ४,२५८ रिक्त

राज्यात मंगळवारी एकाच दिवसात ७११ नवे कोरोना रुग्ण आढळले, तर ४४६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला. सोमवारी २४८ रुग्ण वाढले होते.

सक्रिय कोविड रुग्णांची संख्या वाढत असली तरीही परिस्थिती भीतिदायक नाही. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१३% असून मृत्युदर १.८२% आहे. हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण अत्यंत कमी असून व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्याही नगण्य आहे. मुंबईत कोविड रुग्णांसाठी एकूण ४,३४९ खाटांपैकी ४२५८ खाटा रिकाम्या आहेत. केवळ २.०९% खाटांवर ९१ कोविड रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण दुपटीचे प्रमाण ५,४५६ दिवस आहे. राज्यात सध्या ३७९२ सक्रिय कोविड रुग्ण आहेत. राज्यात आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विमान प्रवाशांची चाचणी सुरू आहे. २% नमुने प्रयोगशाळेत पाठवले जातात.

साताऱ्यामध्ये कर्मचाऱ्यांना मास्क वापर बंधनकारक
सातारा | जिल्ह्यात २ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात ४५ रुग्णांपैकी एकाचीही प्रकृती गंभीर नाही. सीझनल एन्फ्लुएन्झा आजार व कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांत अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती केली आहे. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.