आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमोल कोल्हेंच्या नावाने पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार:इन्स्टाग्रामवर फेक अकाऊंट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इन्स्टाग्रामवर मेसेज करुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंच्या नावाने कोणी पैसे मागितले तर अशा फेक प्रकारापासून सावध रहा. अमोल कोल्हे यांच्या नावाने एक फेक अकाऊंट तयार करण्यात आले आहे. त्यावरुन पैसे उकळण्याचा प्रकार सुरू असल्याचे उघड झाले आहे. याबाबत त्यांनी स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन माहिती दिली आहे.

येका व्यक्तीने अगदी अमोल कोल्हे यांच्या सारखेच तंतोतंत दिसणारे इन्स्टाग्रामव अकाउंट उघडले आहे. संबंधित व्यक्ती ही अमोल कोल्हे यांच्या नावाने लोकांकडे पैसे मागत आहे. हा प्रकार समोर येताच अमोल कोल्हे यांनी या प्रकाराचे स्क्रीनशॉट शेअर केले. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अमोल कोल्हे यांच्या नावाने सुरु केलेल्या अकाउंटवरून त्या व्यक्तीने 20000 हजार रुपये ऑनलाईन पाठवण्याची मागणी केल्याचे या पोस्टमध्ये दिसत आहे. अमोल कोल्हेंची पोस्ट अमोल कोल्हे यांनी पोस्टमध्ये म्हटले की, "@kdr.amol या नावाने Instagram profile बनवून लोकांना मेसेज पाठवले जात आहेत आणि पैशाची मागणी केली जातेय. फोटो नाव सेम दिसत असलं तरी या फेक प्रकारापासून सावध रहा. माझ्या व्हेरिफाईड अकाउंटचे इंस्टा युझरनेम @amolrkolhe असं आहे. @kdr.amol या फेक प्रोफाईल संदर्भात रितसर तक्रार केलेली आहे. कृपया अशा प्रकारांपासून सावध रहा. काळजी घ्या,असे आवाहन त्यांनी केले आहे. अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे हे कायमच चर्चेत असतात. कधी मनोरंजन विश्वातील घडामोडी तर कधी राजकीय फटकेबाजी यामुळे सर्वांचे लक्ष अमोल कोल्हे यांच्याकडे लागलेले असते. त्यांचा चित्रपटही सध्या प्रदर्शनाच्या तयारीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेचा प्रसंग जिवंत करणारा 'शिवप्रताप गरुडझेप' हा त्यांचो चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमोल कोल्हेंचे चाहते खूप आहेत. त्यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज रसिकांमध्ये प्रिय आहेत. त्यांनी राजा शिवछत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती.तसंच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून त्यांनी संभाजी महाराजांचं कार्य घराघरात पोहोचवले.

बातम्या आणखी आहेत...