आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सिद्धिविनायक:अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यास अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध अभिनेते आणि शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील दादरमध्ये असलेले देशभरातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचा कारभार पुढील तीन वर्षेही बांदेकरच सांभाळणार आहेत. आदेश चंद्रकांत बांदेकर यांची श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यास व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी शुक्रवार 24 जुलै 2020 पासून पुढील तीन वर्षांसाठी पुनर्नियुक्ती करण्यात आल्याचे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे.

राज्यभरात आदेश बांधेकर हे भावोजी म्हणून प्रसिद्ध आहेत. ते गेल्या 16 वर्षांपासून 'होम मिनिस्टर' या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. महाराष्ट्रातील घराघरात जाऊन गृहिणींचा सन्मान करण्याचे काम बांदेकर करत आहे. सध्या कोरोना काळ सुरू असल्यामुळे  ‘होम मिनिस्टर घरच्या घरी’मधून घरुनच ते शूटिंग करत आहेत. तसेच 'सोहम प्रॉडक्शन' ही निर्मिती संस्थाही ते चालवतात. 

यासोबतच ते शिवसेनेचे नेते आहेत. आदेश बांदेकर यांनी सप्टेंबर 2009 मध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा मनसेच्या नितीन सरदेसाई यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतरही त्यांनी शिवसेनेच्या नेतृत्वात त्यांचे काम सुरू आहे.