आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंनी शेअर केला फोटो:अभिनेता रजनीकांत मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसह कुटुंबियांची घेतली भेट

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेते रजनीकांत यांनी शनिवारी दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. या भेटीची राजकीय आणि सिने वर्तुळात चर्चा सुरू आहे.

दरम्यान ही भेट राजकीय नाही, केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी देखील रजनीकांत मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती.

मुंबईतील वानखेडे मैदानावर रंगलेला हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया संघातील पहिला वनडे क्रिकेट सामना पाहण्यासाठी रजनीकांत यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर ते खास मुंबईत आले होते. रजनीकांत सध्या कुटुंबासह मुंबईत आहेत. यानिमित्ताने त्यांनी उद्धव ठाकरे यांची ही सदिच्छा भेट घेतली.

रजनीकांत हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते असल्याचे यापूर्वीच्या भेटीत त्यांनी सांगितले होते. त्यामुळे ते मुंबईत आले असताना त्यांनी ‘मातोश्री’वर जात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. रजनीकांत यांचे ठाकरे कुटुंबीयांशी कौटुंबिक नातेसंबंध आहेत.

बातम्या आणखी आहेत...