आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई महापालिकेकडून बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप होत असल्याने सध्या अभिनेता सोनू सूद हा चर्चेत आहे. याच दरम्यान त्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी सकाळी भेट घेतली. सोनू सूदने शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली याविषयी माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सध्या महापालिकेकडून गंभीर आरोप होत असल्यामुळे सोनू सूदने पवारांशी चर्चा केली असल्याची शक्यता आहे.
Mumbai: Actor Sonu Sood paid a courtesy visit to NCP chief Sharad Pawar at the latter's residence today. pic.twitter.com/xTh8wpE9Bs
— ANI (@ANI) January 13, 2021
लॉकडाऊन दरम्यान गरजूंना मदत करुन चर्चेत आलेला अभिनेता सोनू सूदवर बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) सातत्याने आरोप करत आहेत. बेकायदा बांधकामाप्रकरणी वारंवार नोटीस बजावून आणि कारवाई करूनही अभिनेता सोनू सूदने कायद्याचे उल्लंघन करणे थांबवले नाही. त्यामुळे तो वारंवार कायदे मोडणारा गुन्हेगारच आहे, असा दावा महापालिकेने मंगळवारी उच्च न्यायालयामध्ये केला होता. तसेच सोनूला कारवाईपासून कोणताही दिलासा देण्यात येऊ नये अशी मागणीही केली होती.
अवैध निर्मितीतून कमवायचा आहे पैसा
BMC ने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की याचिकाकर्ता (सोनू सूद) एक सवयीचा गुन्हेगार आहे आणि त्याला बेकायदेशीरपणे पैसे कमवायचे आहेत. परवाना विभागाच्या परवानगीशिवाय पाडलेल्या भागाचे बांधकाम त्याने पुन्हा बेकायदेशीर केले, जेणेकरुन ते हॉटेल म्हणून वापरले जाऊ शकेल.
मागील वर्षी प्रथमच नोटीस बजावली
बीएमसीने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोनूला नोटीस बजावली होती. त्याने या नोटीसला डिसेंबरमध्ये दिवाणी न्यायालयात आव्हान दिले होते, परंतु त्याची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर त्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर उच्च न्यायालयाने महापालिकेला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले होते.
काय आहे प्रकरण?
जुहू येथील एबी नायर रोडवरील सहा मजली शक्ती सागर इमारतीचे आवश्यक त्या परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा आरोप सोनू सूदवर आरोप आहे. पालिकेने सोनू सूद विरोधात 4 जानेवारीला तक्रार दाखल केली होती. बीएमसीने दिलेल्या तक्रारीत म्हटले होते, “सोनू सूदने स्वत: जमिनीच्या वापरावर बदल केला आहे. त्याशिवाय निश्चित प्लानमध्ये अतिरिक्त निर्माण करुन रहिवासी इमारतीला हॉटेलच्या इमारतीत रुपांतरीत केले. यासाठी त्यांनी अथॉरिटीकडून आवश्यक ती परवानगी घेतलेली नाही.” बीएमसीने सोनू सूदवर नोटिसकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला. सिव्हिक अथॉरिटीने सांगितल्यानुसार, नोटिस दिल्यावरही सोनू सूद अनधिकृत निर्माण करत राहिला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.