आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंगनाला समर्थन:"हे स्वातंत्र्य भीक मागूनच मिळाले आहे. हे स्वातंत्र्य कोणीही दिलेले नाही", कंगनाच्या स्वातंत्र्याच्या विधानाला ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंकडून समर्थन

मुंबई15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सुशांत सिंह राजपुत आत्महत्या प्रकरणावरून चर्चेत आलेली अभिनेत्री कंगना रनोट नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असते. नुकतेच तिने भारताच्या स्वातंत्र्याबद्दल आपले विधान केले आहे. भारताला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली आहे. त्यावरून कंगनावर आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. राजकीय नेत्यांना कंगनाच्या या विधानवरून तिला चांगलेच सुनावले आहे. मात्र ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी कंगनाला समर्थन दिले आहे.

कंगना रनोट जे म्हणाली त्यावर मी सहमत असल्याची प्रतिक्रिया गोखले यांनी दिली आहे. त्यामुळे आता राज्यात नवीन वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 75 व्या वाढदिवसानिमित्त ब्राह्मण महासंघाच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी आयोजित कार्यक्रमात विक्रम गोखले यांनी अनेक मुद्द्यांवर आपले भाष्य केले. राज्यात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप तसेच शिवसेना- भाजप युती यावर त्यांनी परखडपणे भाष्य केले. त्यानंतर त्यांनी कंगनाने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला देखील जाहीरपणे पाठिंबा दिला आहे.

कंगनाने केलेल्या वक्तव्यावर गोखले म्हणाले की, "हे स्वातंत्र्य भीक मागूनच मिळाले आहे. हे स्वातंत्र्य कोणीही दिलेले नाही. आपले स्वातंत्रवीर जेव्हा फाशीवर जात होते तेव्हा फाशीपासून त्यांना वाचवले नाही, हे चुकीचे आहे. मतपेढीचे राजकारण सुरू झाल्यापासून वाद निर्माण होत आहेत."

"लाल बहादूर शास्त्री सोडून आतापर्यंत देशातील सर्व पंतप्रधानांना मी शंभराच्या खाली गुण देतो. पण त्यांची जयंती ही 2 ऑक्टोबरला येते ती हेतुपुरस्सर पुसली जाते. त्याचा विसर पाडला जातो. किती वर्षे कारस्थान आहे? हा देश कधीही हिरवा होणार नाही हा देश भगवा राहिला पाहिजे." असे विधान विक्रम गोखले यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...