आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मुंबई:अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांच्या भेटीला, पोलिसांकडून चौकशी

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपूत काही वर्षांपूर्वी रिलेशनशीपमध्ये होते
Advertisement
Advertisement

अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा परवा(ता.14) मृत्यू झाला. गळफास घेऊन त्याने आपले आयुष्य संपवले. काल(ता.15) त्याच्या अंत्यविधी करण्यात आला. त्यानंतर आज सुशांतची एक्स गर्लफ्रेण्ड आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे सुशांतच्या वडिलांना भेटण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. यावेळी पोलिसांनी तिची चौकशी केल्याची माध्यमातून माहिती समोर आली आहे.

सुशांतच्या अंत्यसंस्कारासाठी त्याचे वडील बिहारहून मुंबईत आले होत. ते सध्या सुशांतच्या वांद्र्यातील घरात थांबले आहेत. त्यामुळे वडिलांचे सांत्वन करण्यासाठी अंकिता सकाळी आली होती. यादरम्यान, पोलिसही तिथे उपस्थित होते. यावेळी तिला सुशांतविषयी काही माहिती होती का, याबाबत त्यांनी विचारणा केली. अंकिताने नेमके काय सांगितले, हे अद्याप समजू शकलेले नाही.

सुशांतच्या पार्थिवावर काल मुंबईतील विले पार्लेत पवन हंस स्मशानभूमीत संध्याकाळी पावणेपाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणात वडिलांकडून त्याच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. यावेळी त्याची बहीण, तिचा पती, मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि काही जवळचे नातेवाईक, मित्र उपस्थित होते. 

Advertisement
0