आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कंगना रनोट vs जावेद अख्तर:जावेद अख्तर यांच्या मानहानी प्रकरणात कंगना रनोटला जामीन, अभिनेत्रीने वारंट रद्द करण्याची केली होती अपील

मुंबई23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती

जावेद अख्तर यांच्या मानहानीप्रकरणी मुंबईच्या अंधेरी कोर्टाने कंगना रनोटला गुरुवारी जामीन मंजूर केला. जामीन वॉरंट रद्द करण्यासाठी कंगनाने न्यायालयात अपील केली होती. यापूर्वी जावेद अख्तर यांच्या वतीने दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात कंगनाला मुंबई कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिले होते. जेव्हा कंगना कोर्टात हजर झाली नव्हती तेव्हा तिच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते. कंगनाने याबद्दल सोशल मिडियावर लिहिले आहे - गिधडांची एक झुंड आणि एक वाघीण.

जावेद अख्तर यांच्या याचिकेवर मुंबई कोर्टाने कंगनाच्या विरोधात समन्स बजावले होते. जावेद अख्तर यांच्या तक्रारीच्या आधारे कंगनाविरोधात मानहानीचा खटला चालवला जात असल्याचे मुंबई पोलिसांनी कोर्टाला सांगितले होते. याची चौकशी होणे आवश्यक आहे. त्यानंतर अंधेरी मेट्रोपॉलिटन दंडाधिका-यांनी डिसेंबर 2020 मध्ये जुहू पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते. जावेद अख्तर यांनी नोव्हेंबरमध्ये दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीची चौकशी जुहू पोलिसांनी करावी आणि 16 जानेवारीपर्यंत अहवाल सादर करावा, असे कोर्टाने म्हटले होते.

2 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती
जावेद अख्तर यांनी त्यांचे वकील निरंजन मुंदर्गी यांच्यामार्फत 2 नोव्हेंबर रोजी तक्रार दाखल केली होती. यात त्यांनी कंगना रनोटविरूद्ध बदनामी केल्याचा आरोप केला होता.अख्तर यांनी म्हटले होते की टीव्ही मुलाखती दरम्यान कंगनाने त्यांच्यावर खोटा आरोप केला होता की त्यांनी (अख्तरने) हृतिक रोशनविरूद्ध दाखल केलेला खटला मागे घेण्याची धमकी कंगनाला दिली होती.

अख्तर यांनी आपल्या तक्रारीत म्हटले होते की, कंगनाने मुलाखतीत त्यांना सुसाइड गँगचा भाग असल्याचे सांगितले होते. अख्तर यांनी तिला धमकी दिली होती की तिने हृतिकवरील खटला मागे घेतला नाही तर तिला आत्महत्या करण्याशिवाय मार्ग राहणार नाही असा आरोपही कंगनाने केला होता. अख्तर यांचा असा दावा आहे की कंगनाच्या या टिप्पणीमुळे त्यांना अनेक धमकीचे फोन कॉल आणि मेसेजेस आले. त्यांना सोशल मीडियावरही ट्रोल केले गेले होते. त्यांच्या मते या टिप्पणीमुळे त्यांची प्रतिष्ठा खराब झाली आहे. या प्रकरणात जावेद अख्तर यांचे निवेदन 3 डिसेंबर रोजी दंडाधिकारी कोर्टाने नोंदवले होते.

मुलाखतीत कंगना काय म्हणाली होती?
एका एंटरटेनमेंट वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली की जावेद अख्तर यांनी तिला घरी बोलावून धमकी दिली होती. कंगनाच्या म्हणण्यानुसार, अख्तर म्हणाले होते की राकेश रोशन आणि त्याचे कुटुंब मोठे लोक आहेत. जर तिने (कंगना) माफी मागितली नाही तर ते तुला तुरूंगात टाकतील.

यापूर्वी कंगनाची बहीण रंगोली चंदेलनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून हा दावा केला होता. तिने लिहिले, 'जावेद अख्तर जी यांनी कंगनाला घरी बोलावले आणि हृतिक रोशनची माफी मागण्याची धमकी दिली. महेश भट्ट यांनी कंगनावर चप्पल फेकली होती, कारण तिने भट्ट यांच्या चित्रपटात सुसाइड बॉम्बरची भूमिका निभावण्यास नकार दिला होता. ते पंतप्रधानांना फासीवादी म्हणतात... चाचाजी तुम्ही दोघे काय आहात?

बातम्या आणखी आहेत...