आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कंगना राजभवनात:बीएमसीने कार्यालय पाडल्याच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रनोट राजभवनात, राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची घेतली भेट

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली होती.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आहे. बीएमसीने कंगनाचे वांद्र्यातील कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी ही भेट होती असे बोलले जात आहे. दरम्यान या भेटीमध्ये नेमक्या कोणत्या विषयांवर चर्चा झाली याविषयी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

अभिनेत्री कंगना रनोट साडेतीन वाजताच्या सुमारास वांद्र्यातील घरातून निघाली. दुपारी चार वाजता ती राजभवनात पोहोचली. तिने राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली आहे. यावेळी तिची बहीण रंगोली तिच्यासोबत उपस्थित होती.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात आक्रमकपणे भूमिका मांडणाऱ्या अभिनेत्री कंगना रनोटने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली होती. यानंतर मोठ्या वादाला सुरुवात झाली होती. यानंतर कंगना विरुद्ध संजय राऊत असं शाब्दिक युद्धही झालं होतं. दरम्यान महापालिकेनं अनधिकृत बांधकाम केल्याच्या प्रकरणात कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. यानंतर कंगना जास्तच भडकली होती.