आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेत्री केतकी चितळे ही आपल्या सोशल मीडियातील पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियातील पोस्टमुळे केतकीला यापूर्वी अनेकदा ट्रोलही करण्यात आले आहे. आता पुन्हा एकता ती वादग्रस्त पोस्टमुळे अडचणीत सापडली आहे. केतकी चितळेने आपल्या फेसबूक अकाऊंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट केली. या प्रकरणी तिच्या विरोधात कळवा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेत्री केतकी चितळेने आपल्या फेसबूक पोस्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अत्यंत वाईट भाषेत टीका केली. नितीन भावे नावाच्या व्यक्तीच्या नावाने लिहिलेली ही पोस्ट आहे असे तीने या पोस्टमध्ये लिहिले आहे. कळवा पोलिस स्टेशनमध्ये 153 ओ आणि 505 अंतर्गतगुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल झाल्याने केतकीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. केतकीच्या या वादग्रस्त पोस्टनंतर सोशल मीडियावरही तिच्यावर संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांत केलेल्या तक्रारीमध्ये नेमके काय म्हटले आहे?
कळवा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, केतकी चितळे हिने राजकीय व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या संबधाने बदनामीकारक पोस्ट केली. यामुळे आमच्या पक्षातील नेते, कार्यकर्ते आणि लोकांमध्ये भावनिक व तीव्र नाराजीची भावना निर्माण झाली आहे. अशा पोस्टमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच केतकी चितळेने ही पोस्ट करुन भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेशाची भावना, तेढ, वैमनस्य निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे. या महिलेने आणखी अशा काही पोस्ट करण्याची शक्यता आहे. यामुळे या महिलेविरुद्ध तक्रार देण्यात येत आहे.
पुण्यातही दाखल केली तक्रार
वादग्रस्त पोस्ट प्रकरणी केतकी चितळे विरोधात कळवा पोलिस स्टेशन पाठोपाठ पुण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
रुपाली ठोंबरेंची टीका
केतकी चितळेच्या या पोस्टनंतर तिच्यावर सोशल मीडियावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान नेत्या रुपाली ठोंंबरे यांनीची तिच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, 'हरामखोर विकृती, मनोरुग्ण तुला चपलेने 100 मारून 1 मोजले पाहीजे.. कशात ना मशात केतकीबाई तमाशात, लवकरच जंगी चोपाची गरज आहे हिला, मिळणारच बाई तुला चोप.'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.