आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त पोस्ट प्रकरण:अखेर महिनाभरानंतर अभिनेत्री केतकी चितळेची कारागृहातून सुटका; ठाणे न्यायालयाचा दिलासा

ठाणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महिनाभरानंतर अखेर अभिनेत्री केतकी चितळेची कारागृहातून सुटका होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी ठाणे जिल्हा न्यायालयाने केतकीला जामीन मंजूर केला आहे.

जिल्हा न्यायाधीश एच. एम. पटवर्धन यांनी २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तिला जामीन मंजूर केला. जामीन मंजूर झाल्याने केतकीची आता ठाणे कारागृहातून सुटका होईल, असे तिच्या वकिलांनी सांगितले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी १४ मे २०२२ रोजी ठाणे पोलिसांनी तिला अटक केली होती.