आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर:अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन, ठाणे सत्र न्यायालयाचा दिलासा

मुंबई16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री केतकी चितळेला जामीन मंजूर करण्यात आला आहे. ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाने जुन्या अ‍ॅट्रॉसिटी प्रकरणात जामीन मंजूर केला असून, हा केतकीसाठी मोठा दिलासा आहे. न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

14 मे रोजी अटक

राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांच्याबाबत समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. राज्यभरातून केतळीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी 14 मे रोजी तिला अटक केली होती.

गुन्हे रद्द करा

दरम्यान केतकीने आपल्यावरील गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सोशल मीडियावर आपण पवार नावाच्या व्यक्तीबद्दल पोस्ट केली असली तरी, माझ्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यात पवार व्यक्तीने नाव नाहीत. म्हणजेच पवार नावाच्या कोणत्याही व्यक्तीने माझ्याविरोधात तक्रार किंवा गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पोलिसांनी मला अटक कशी काय केली असा सवाल केतकीने केला आहे. त्यामुळे दाखल झालेले सर्व गुन्हे रद्द करण्यात यावे अशी याचिका केतकीने मुंबई हायकोर्टात केली आहे.

हे गुन्हे दाखल

केतकीवर बदनामी करणे, धर्म आणि वंशाच्या आधारे विविध समाजांमध्ये शत्रुत्व वाढवणे या आरोपांतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...