आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकनाथ शिंदेंना टोला:तोतया मुख्यमंत्र्यांना स्मारकात स्थान नाही ; उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे बांधकाम मे २०२३ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर काही काळातच ते जनतेला खुले होईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, या स्मारकात शिवसेनेचा पहिला नगरसेवक, पहिला आमदार, पहिला खासदार, पहिला मुख्यमंत्री यांची माहिती दिली जाईल. मात्र, शिवसेनेच्या नावावर झालेल्या तोतया मुख्यमंत्र्यांना यात स्थान नसेल, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.

या वेळी ठाकरे म्हणाले, स्मारकात शिवसेनेच्या सर्व मुख्यमंत्र्यांची माहिती दिली जाईल. मात्र, केवळ शिवसेनेच्याच मुख्यमंत्र्यांची माहिती असेल. शिवसेनेचे नाव मिळवून तोतयागिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या स्मारकात स्थान नसेल. येत्या १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा १० वा स्मृतिदिन आहे. म्हणता म्हणता बाळासाहेबांना जाऊन १० वर्षे झाली. तेव्हाच बाळासाहेबांच्या स्मारकाचीही घोषणा केली होती. त्यांचे फोटो, व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले.

स्मारकाचे जवळपास ५८ टक्के काम झाले पूर्ण ठाकरे म्हणाले, स्मारकाचे जवळपास ५८ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील मेपर्यंत त्याचे बांधकाम पूर्ण होईल. त्यानंतर काही काळ स्मारक पूर्ण करण्यात जाईल. या स्मारकात बाळासाहेबांशी संबंधित सर्व ऑडिओ, व्हिडिओ, फोटो, वृत्तपत्रांतील बातम्यांचे कात्रण, त्यांची व्यंगचित्रे यांचा समावेश असेल. मात्र, या स्मारकात बाळासाहेबांचा पुतळा नसेल. कारण केवळ पुतळा म्हणजे स्मारक नाही. हे केवळ संग्रहालय असणार नाही, तर ते सर्वांसाठी स्फूर्तिस्थान आणि प्रेरणास्थान असणार आहे.

बातम्या आणखी आहेत...