आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवद्रोह होत असेल, तर अशांना वठणीवर आणू. त्यांना शाहिस्तेखानासारखी कायमची अद्दल घडवावी लागेल, असा इशारा छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. उदयनराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना एक भावनिक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी आपली वेदना मांडली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्याविरोधात उदयनराजे आक्रमक झाले आहेत. त्यांनी शनिवारी रायगडवर ‘निर्धार शिवसन्माचा’ म्हणत कूच केले. राज्यपाल पदावरून कोश्यारींना हटवा, अन्यथा मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करू असा इशारा दिला आहे. त्यानंतर उदयनराजे यांनी लिहिलेले हे पत्र समोर आले आहे.
कॅबिनेटमध्ये राज्यपालांचा निषेध व्हायला पाहिजे होता: राऊत : शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, कॅबिनेटमध्ये राज्यपालाविरुद्ध निंदा प्रस्ताव येणे गरजेचे होते आणि केंद्राला देखील कळवायला पाहिजे होते. राज्यपालांनी केलेल्या विधानावरील सत्ताधाऱ्यांचा खुलासा आमच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे, असेही राऊत यांनी या वेळी सांगितले. उदयनराजेंच्या भावनांशी आम्ही सर्व सहमत आहोत. ज्या पक्षाचे उदयनराजे खासदार आहेत त्याच पक्षाकडून हा अपमान वारंवार होत आहे. तरीही तो पक्ष माफी मागायला तयार नाही. पर्यटनमंत्र्यांनी जे वक्तव्य केले त्यांनाही जाब विचारला नाही, असेही राऊत म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.