आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावर्षी कंपनीचे शेअर्स दुप्पट:अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्सचा विक्रमी उच्चांक

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अब्जाधीश गौतम अदानींच्या नेतृत्वातील अदानी समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेस गुरुवारी (३ नोव्हेंबर) रोजी आपला निकाल सादर करणार आहे. अशा परिस्थितीत कंपनीचे शेअर्स घसरले होते. आता पुन्हा त्यात तेजी दिसून आली आहे. बीएसईमध्ये बुधवारी कंपनीचे शेअर ०.०७% वाढीसह ३,५७८वर बंद झाले. आता ते आपल्या २० सप्टेंबरच्या ऑल टाइम हाय ३,८८३.७० रुपयाच्या फक्त ७.८७% दूर आहेत. एक दिवस आधी मंगळवारीच या शेअर्समध्ये ६.८५% वाढ झाली. या वर्षी कंपनीचा शेअर्स दुप्पटपेक्षा जास्त महाग झाले. मुंबईच्या वेल्थमिल्स सिक्युरिटीजचे संचालक क्रांती बठिनीने सांगितले, “अदानी एंटरप्रायझेसचे शेअर वेगाने वाढले, कारण गंुतवणूकदार शानदार निकाल आणि कंपनीसाठी मजबूत आऊटलुकची अपेक्षा करत आहेत. समुहाच्या इतर कंपनीत डेट इन्व्हेस्टर्सदेखील उत्साहित होत आहेत कारण कंपनीची वाढ, गंुतवणूक आणि उधारीविषयी अदानी एंटरप्रायझेस काय माहिती देते, याविषयी जाणून घ्यायचे आहे. ग्रुप कंपनी अदानी हरित ऊर्जाचे डिसेंबर २०२४च्या डॉलर बाँडची किमत बुधवारी ०.९% वाढली होती.

बातम्या आणखी आहेत...