आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगातील पाचवे सर्वात श्रीमंत गौतम अदानी यांच्या यशात आणखी भर पडली आहे. महसुलाच्या दृष्टीने अदानी विल्मरने ८८ वर्षे जुनी हिंदुस्तान युनिलिव्हर लि. (एचयूएल) कंपनीला मागे टाकले आहे. आता ती देशातील सर्वात मोठी एफएमसीजी कंपनी बनली आहे. अदानी समूह आणि सिंगापूरच्या विल्मर इंटरनॅशनलचा संयुक्त उपक्रम असलेल्या अदानी विल्मरची उत्पादनांद्वारे विक्रीतून झालेली कमाई २०२१-२२ मध्ये ५४,२१४ कोटी रुपये राहिली. ती वार्षिक आधारावर ४६.२% वाढली. मागील वर्षी ती ३७,०९० कोटी रुपये होती. एचयूएलची २०२१-२२ मध्ये उत्पादनांच्या विक्रीतून झालेली कमाई ५१,४७२ कोटी रुपये होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.