आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धमकी प्रकरण:अदार पूनावा यांनी धमक्या देणाऱ्या नेत्यांची नावे जाहीर करावी, त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सीरम इंस्टिट्युटचे सीईओ अदार पूनावाला यांच्या धमकीच्या खुलाशानंतर राजकीय वातावरण आता तापले आहे. अदार पूनावाला यांनी धमकी देणाऱ्या बड्या नेत्यांची नावे जाहीर करावी. त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी काँग्रेस घेईल. असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले आहे. अदार पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वीच भारत सोडून सहकुटुंब ब्रिटन गाठले. यानंतर तेथील माध्यमांशी संवाद साधताना आपल्याला भारतात मुख्यमंत्री स्तराच्या नेत्यांकडून धमक्या मिळत असल्याचा खुलासा केला. त्यावरच नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका मांडली आहे.

नेमके काय म्हणाले होते अदार पूनावाला
पूनावाला यांनी सांगितल्याप्रमाणे, भारतात प्रत्येकाला लस आधी मिळावी असे वाटत आहे. यातून मोठ-मोठे उद्योजक, नेते आणि मुख्यमंत्री स्तराच्या लोकांकडून धमकीचे फोन येत आहेत. त्यामुळे तूर्तास भारतात परतणार नाही. गेल्या आठवड्यात त्यांनी हा खुलासा केल्यानंतर एक सोशल मीडिया पोस्ट जारी केली होती. त्यामध्ये पुण्यात सीरम इंस्टिट्युटच्या कोव्हीशील्डचे उत्पादन जोरात सुरू असून आपण लवकरच भारतात परतणार आहोत असे त्यांनी लिहिले होते.

विशेष म्हणजे, पूनावाला यांना धमकी मिळाल्यानंतर केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलाचे जवान आणि कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. भारतात ऑक्सफोर्ड आणि एक्ट्राजेनेकाचे कोव्हीशील्ड लसीचे उत्पादन सीरम इंस्टिट्यूट करत आहे. तर भारत बायोटेककडून कोव्हॅक्सीन लस तयार केली जात आहे. या दोनच लस भारतात प्रामुख्याने लसीकरणात वापरल्या जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...