आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबई:राज्यामधील सर्वच इंटर्न डॉक्टरांना कोरोनाकाळासाठी अतिरिक्त भत्ता, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आधी मुंबई, पुण्यापुरताच होता नियम

मुंबई, पुण्याप्रमाणेच आता राज्यातील सर्वच इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना कोविड काळातील सेवेसाठी अतिरिक्त भत्ता देण्यात येईल, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यासाठी मंगळवारी एक बैठकही आयोजित करण्यात आली.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तंत्रज्ञानाद्वारे झालेल्या या बैठकीत देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या निवासस्थानाहून सहभागी झाले. यासंदर्भातील सूचना डिसेंबर अधिवेशनात विनियोजन विधेयकाच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.

देवेंद्र फडणवीस यांनी या बैठकीत सांगितले की, कोरोनाच्या काळात राज्यातील सर्वच जिल्ह्यांत डॉक्टर्स आपले योगदान देत आहेत. त्यामुळे केवळ मुंबई, पुण्याला एक न्याय आणि अन्य जिल्ह्यांना दुसरा असे करता येणार नाही. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांसाठी एकच निकष लावण्यात यावा. देवेंद्र फडणवीस यांची ही मागणी अजित पवार यांनी तत्काळ मान्य केली आणि वित्त विभागाने प्रतिकूल अभिप्राय दिला असला तरी आपण त्यावर आदेश जारी करू, असे आश्वासन त्यांनी दिले.

आता मिळणार इतका भत्ता
मुंबई आणि पुण्यातील इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरांना अनुक्रमे ३९,००० रुपये आणि ३० हजार रुपये याप्रमाणे विशेष भत्ता दिला जात होता. मात्र अन्य शहरांमध्ये तो केवळ ११ हजार रुपये इतकाच होता.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser