आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायकोर्टात धाव:मुंबई महापालिकेच्या नोटीसीविरोधात नारायण राणेंची उच्च न्यायालयात धाव, 'अधीश' बंगल्याच्या अनधिकृत बांधकाम प्रकरणामुळे अडचणीत

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना आणि भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात वाद सुरु आहे. मुंबई महापालिकेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दुसऱ्यांदा नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे आता नारायण राणेंनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील 'अधीश' या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले होते. या प्रकरणी नारायण राणे यांना हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. दिलेल्या मुदतीत जर हे बांधकाम हटवले नाही तर पालिकेकडून यावर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला होता. आता या नोटीशीचा कालावधी संपत आला आहे. त्यामुळे या कारवाईला स्थगिती मिळावी आणि ही नोटीस रद्द करावी अशी मागणी करत नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहूमध्ये अधीश नावाचा बंगला आहे. या बंगल्यामध्ये अनधिकृत बांधकाम झाल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे मुंबई पालिकेकडून दोन वेळा राणेंच्या बंगल्याची पाहणी करण्यात आली होती. यानंतर नारायण राणेंच्या घराला मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. राणेंना 15 दिवसांची नोटीस देण्यात आली. कारवाई थांबवण्यासाठी राणेंची हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...