आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीसांना ठाकरेंचे प्रत्युत्तर:आदित्य यांचे चार VIDEO जारी करून भाजपच्या आरोपाचा पर्दाफाश केल्याचा दावा

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

खोके सरकार, खोटे सरकार. असत्याचा पर्दाफाश म्हणत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आदित्य ठाकरे यांचे चार व्हिडीओ जारी करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. प्रकल्पाच्या पळवापळवीवरून पुन्हा एकदा जोरदार राजकारण पेटले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्रकार परिषद देत महाराष्ट्रातून प्रकल्प जाणे हे महाविकास आघाडी सरकारचे पाप असल्याचा आरोप केला होता. त्यांच्या प्रश्नांना आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत त्याच दिवशी उत्तर दिले. फडणवीसांचे चार प्रश्न आणि त्यांना आदित्य यांनी दिलेली उत्तरे व्हिडीओतून दाखवली आहेत. व्हिडीओवर खोके सरकार, खोटे सरकार, असत्याचा पर्दाफाश...अशा ओळी लिहून भाजपला डिवचण्यात आले आहे.

व्हिडीओतला मजकूर जशास तसा

देवेंद्र फडणवीसः फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नाही. कोणाच्या काळात म्हंटलंय, उद्धव ठाकरेजींच्याच काळात म्हंटलंय.

आदित्य ठाकरेः कधीही एकढं खोटं बोलल्याचं ऐकलं नव्हतं मी राज्यात, जेवढं आज मी त्या पत्रकार परिषदेत ऐकलं. ही आहे साधारणतः जानेवारी 2020 ची बातमी. त्या फॉक्सकॉनमध्ये आणि वेदांता - फॉक्सकॉनमध्ये जमीन अस्मानचा अंतर आहे. वेदांता - फॉक्सकॉन हा प्रकल्प सेमीकंडक्टरसाठी होता. या मोबाइल फोनसाठी नव्हता.

देवेंद्र फडणवीसः या प्रोजेक्टचे जे प्रमुख आहेत, मी नावे या करिता घेत नाही की, त्यांना अडचणी येतात. त्यावेळेस त्यांचे शब्द होते. यहाँ का माहोल इनव्हेस्टमेंट जैसा नही है देवेंद्रजी. तरीही त्यांना आग्रह केला. ते म्हणाले ठीक आहे. विचार करके मैं बोर्ड से बात करूंगा.

आदित्य ठाकरेः मी उपमुख्यमंत्री महोदयांना चॅलेंज करतो की, जे त्यांनी सांगितले की टाटाच्या एका उच्चाधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्रात वातावरण बरोबर नाहीय. ते त्यांनी लोकांसमोर येऊन नाव सांगावं. कारण जे आम्हाला सांगतलं आमच्या भेटीत, ते स्पष्टपणे सांगितलं की, केंद्र सरकार जिथे सांगेल, तिथे आम्हाला जावे लागेल.

देवेंद्र फडणवीसः एकीकडे महाराष्ट्रामध्ये आमचे सरकार येऊन तीनच महिने झालेत तरीही एक फेक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न होतोय. महाराष्ट्रातून उद्योग चालले आहेत. दुर्दैवाने चार - पाच बोटावर मोजण्या इतके पत्रकार. या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या बदनामीचा घाट घातलाय. मला तर आश्चर्य वाटते काही शेंबडी पोरं काल नागपूरमध्ये आंदोलन करत होते सॅफ्रान गेल्याच्या संदर्भात. त्यांच्या सरकारच्या काळात एक वर्षापूर्वी गेलेल्या सॅफ्रानवर ते आज आंदोलन करतायत.

आदित्य ठाकरेः फ्रीडम ऑफ स्पीच.यावर विश्वास ठेवणारे पत्रकार असतील. जे आमच्यावरही टीका करतात. तुमच्यासारखे अनेक आहेत. हीज मास्टरर्स व्हाइस कोणाला बोलणं, शेंबडी पोरं तरुणांना बोलणं हे पत्रकारांच आणि पत्रकारितेचा अपमान आहे. आणि शेंबडी पोरं. हे जे आंदोलन करतायत स्वतःच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या आवाजासाठी. जे प्रकल्प या खोके सरकारमुळे दुसरीकडे निघून गेले, त्यांना शेंबडी पोरं बोलणं हे खूपच अयोग्य आणि निंदनीय आहे.

देवेंद्र फडणवीसः माझे मागच्या सरकारला आव्हान आहे.एक अनाउसमेंट दाखवा की केंद्र सरकराने महाराष्ट्राला सांगितलंय की बल्क ड्रग पार्क देतो. किंवा महाराष्ट्राला मेडिकल डिव्हाइस पार्क देतो.

आदित्य ठाकरेः दोन प्रस्ताव दिलेले आहेत. ड्रक पार्कसाठी ३० ऑगस्ट २०२१ ला शासनाचा प्रस्ताव हा केंद्र सरकारकडे गेला होता. मेडिकल डिव्हाइस पार्कसाठी १४ ऑक्टोबर २०२१ ला शासनाचा प्रस्ताव केंद्र सरकारडे गेला होता. आम्ही जर खोटे बोलत असू, तर हे देसाई साहेबांचे ट्विटस खोटे आहेत का? ही बातमी तर खोटी नसू शकते. निधी आयोग. डिफेन्स मॅनिफॅक्चरिंग हब तसेच डिफेन्स बल्क ड्रग पार्क केंद्र सरकारच्या योजना महाराष्ट्रात मंजूर होण्यासाठी सहाय्य करण्याची विनंती केली. हे ११ जून २०२१ चे ट्विट आहे.

बातम्या आणखी आहेत...