आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आदित्य ठाकरेंचे भाष्य:भाजपकडून होणाऱ्या वैयक्तिक आरोपांवर आदित्य ठाकरेंनी केले भाष्य, बॉलिवूडसोबतच्या संबंधांवरील टीकेवरही सोडले मौन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकार बदलल्याने त्यांच्या चश्म्याचा नंबरही बदलला असेल

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपकडून सातत्याने टीका केली जात असते. यासोबत सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बॉलिवूडसोबत त्यांचे नावही जोडले गेले. या सर्वच विषयांवर आदित्य ठाकरेंनी मौन सोडले आहे. 'महाविकास आघाडी सरकार चांगले काम करत आहे. त्याच्यावर कोणीही प्रश्न उपस्थित केले नाहीत. भाजपाला माझ्यापासून भीती वाटत असल्यानेच वैयक्तिक हल्ला करत असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले आहे.

दुर्लक्ष करणे जास्त योग्य
आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपकडून वारंवार टीका केली जात असते. यावरील प्रश्नावर आदित्य म्हणाले की, 'त्याच्याकडे दुर्लक्ष करणे हे जास्त योग्य असल्याचे मला वाटले. कामावर माझे संपूर्ण लक्ष होते यामुळे तिकडे लक्ष गेले नाही. महाविकास आघाडी चांगले काम करतेय. यामुळे कोणीही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत ही आमच्यासाठी दिलासा देणारी बाब आहे. याच कारणाने चुकीचे आरोप आणि वैयक्तिक हल्ले करण्यात आले. मात्र पाच वर्षे आम्ही काम करु, राजकारण नाही'.

कदाचित त्यांना माझ्यापासून भीती वाटत असेल
आदित्य ठाकरे भाजपच्या वैयक्तिक टीकांबाबत टोला लगावत म्हणाले की, 'जिथपर्यंत माझ्यावर वैयक्तिक हल्ला होण्याची बाब आहे. तुम्ही फुटबॉल पाहिले असेल तिथे मेस्सी किंवा रोनाल्डो यांच्यासाठी मॅन टू मॅन मार्किंग केली जाते. त्यांनी गोल करु नये यासाठी घेरण्यात येत असते. कदातिच त्यांना माझ्यापासून भीती वाटत असेल' असा टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

बॉलिवूडसोबतच्या संबंधांवरील टीकेवर म्हणाले...
आदित्य ठाकरेंचे बॉलिवूडसोबत संबंध असल्याच्या टीका अनेकदा केल्या जात असतात. यावरही आदित्य यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, 'जोपर्यंत आपले सरकार होते तोपर्यंत सर्व काही सुरूळीत चालू होते असे विरोधकांना वाटत आहे. विमान भरुन दिल्लीला कार्यक्रमात जायचे. त्यांच्यासाठी गाणी गायचे. त्यांच्याशी चांगले संबंधही होते. मात्र जेव्हापासून सरकार गेले आहे तेव्हापासून त्यांना ते वाईट वाटत आहे. बॉलिवूड आणि मुंबईतील लोक वाईट असल्याचे वाटत आहे. मुंबईला ड्रग्ज सेंटर बोलले जातेय. सरकार बदलल्याने त्यांच्या चश्म्याचा नंबरही बदलला असेल. तसंच त्यांच्या पोटात दुखतेय. '.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser