आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा पार पडणार आहे. तर भाजपने देखील आज शहरात वीर सावरकर गौरव यात्रा आयोजित केली आहे. यावरुन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, काही राजकीय पक्ष सर्व काही राजकारणासाठीच करत असतात, मनापासून काही करत नाहीत. दुसऱ्यांचे आदर्श चोरण्यापासून ते नाव चोरण्यापर्यंत हे सर्व काही राजकारणासाठी होत आहे. पण आम्ही आमचे काम करत असून लोकांनाही याची जाणीव आहे. ज्यावेळी निवडणुका होतील, तेव्हा लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील. जे प्रामाणिक लोक आहेत त्यांना पुन्हा एकदा निवडून देतील आणि गद्दारांना घरी बसवतील.
आदित्य ठाकरे म्हणाले की, खासदार संजय राऊत यांच्या धमकी प्रकरणी विचारले असता ते म्हणाले, सध्या महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या पाच-सहा महिन्यात राज्यातील परिस्थिती भयानक होत चालली आहे. संजय राऊत यांना आलेल्या धमकीचा पोलिस तपास करत असून कारवाई झाली पाहिजे. यावेळी सत्ताधाऱ्यांकडून महिला नेत्यांबद्दल वापरल्या जाणाऱ्या अर्वाच्च भाषेचाही आदित्य ठाकरे यांनी समाजार घेतला.
आदित्य ठाकरे म्हणाले की, उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना शिविगाळ करणाऱ्यांवर अद्याप कारवाई झालेली नाही. त्यांची हकालपट्टीही झाली नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले. अधिवेशन सुरू असताना भाजप कार्यकर्त्याला गद्दार गटाच्या लोकांनी मारहाण केली होती. भाजप कार्यकर्त्याला हात लावल्यावर सगळ्या केंद्रीय यंत्रणा येतील असे वाटत होते. परंतु मारहाण करणारे गद्दार गटाचे असल्याने त्यांच्यावर कारवाई झाली नाही. दोन पक्षातच गँगवार सुरू झाले हा प्रश्न आहे. भाजप कार्यकर्त्याला मारहाण होऊनही कारवाई होत नसेल तर नक्की कोणाच्या दबावाखाली हे सगळे होते, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.