आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अब्दुल गद्दार राज्याचे घटनाबाह्य कृषिमंत्री:सत्तारांच्या अपशब्दांवरून आदित्य ठाकरेंची टीका; अशी घाण हवी का, केंद्राला सवाल

मुंबई5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अब्दुल गद्दार राज्याचे घटनाबाह्य कृषिमंत्री आहेत. त्यांनी सुप्रिया सुळेंबद्दल घाणेरडे शब्द वापरले आहेत, अशी घाण केंद्रातल्या भाजप सरकारला हवी आहे का, असा सवाल सोमवारी युवासेनाप्रमुख आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बुलढाण्यात बोलताना केला.

गुलाबराव पाटील असो की, मुंबईचा तो आमदार. हे सर्व चाळीस गद्दार महाराष्ट्राचे वातावरण खराब करीत आहेत. ते ही फक्त राक्षसी महत्त्वकांक्षा असलेल्या व्यक्तीसाठीच, अशी टीकाही त्यांनी केली.

सत्तारांवर कारवाई होईल?

आदित्य ठाकरे म्हणाले, अब्दुल सत्तारांवर काही कारवाई होईल का? आज शेतकरी त्रस्त आहे पण ते गलिच्छ प्रकार करीत आहेत. मला नाव ठेवा पण महिलेंवर टीका करणे अयोग्य नाही.

40 गद्दारांकडून वातावरण खराब

आदित्य ठाकरे म्हणाले, एकाच्या राक्षसी महत्त्वकांक्षेमुळे चाळीस गद्दारांनी राज्याचे वातावरण खराब केले आहे. परवा गुलाबराव पाटील तसेच बोलले. आज दुसरे गद्दारही तसेच बोलले. मुंबईत एका गद्दार आमदाराने दोन लोकांना धमकावली. राजकारणाची पातळी आणखी किती खाली नेणार. कायदा सुव्यवस्था राज्यात आहे का, महिला सुरक्षा आहे का भाजप चाळीस गद्दारांसोबत राहणार की, काही कारवाई करणार.

हा खेळ तर नाही ना..!

आदित्य ठाकरे म्हणाले, महिला आयोगाकडून नोटीस दिली जाणार की, केवळ राजकीय खेळासाठी कारवाई केली जाणार नाही हे समजेल. आम्हाला शिवी देण्यापेक्षा कृषिमंत्र्यांनी स्वःतचे आत्मपरिक्षण करावे.

बातम्या आणखी आहेत...