आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लॉकडाउन वाढीला विरोध:घरी परतण्यासाठी वांद्रे स्टेशनवर नागरिकांची तुफान गर्दी, आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 24 तासांसाठी ट्रेन का सुरू केली नाही? आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला सवाल

पीएम मोदींनी 23 मार्च रोजी लागू केलेल्या लॉकडाउनचा आज शेवटचा दिवस होता. दरम्यान वांद्रे स्टेशन परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी गेली होती. आपआपल्या गावी जाण्यासाठी हे नागरिक निघाले होते. 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असल्याची कल्पना नसणाऱ्या नागरिकांनी आपल्या गावी जाण्यासाठी ही गर्दी केली होती. अचानक झालेल्या गर्दीमुळे पोलिसांची तारांबळ उडाली.  पोलीस ह्या नागरिकांना समज देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तरीही हे नागरिक ऐकत नसल्याने पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. त्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. देशभरात कोरोना व्हायरसचे संकट असतांना जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या गोष्टीचे कदाचित नागरिकांना भान राहिलेले दिसत नाही. दरम्यान या गोंधळानंतर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारने 24 तासांसाठी ट्रेन का सुरू केली नाही असा सवाल त्यांनी केंद्राला विचारला आहे.  

आदित्य ठाकरेंनी ट्वीट केले की, वांद्रे स्थानकातील सध्याची विखुरलेली परिस्थिती, किंवा सूरतमधील दंगल ही केंद्र सरकार स्थलांतरित कामगारांसाठी घरी परत जाण्याची व्यवस्था करण्यास सक्षम नसल्याचा परिणाम आहे. या कामगारांना अन्न किंवा निवारा नको, तर त्यांना आपल्या घरी परत जायचे आहे. 

आदित्य ठाकरेंनी अन्य ट्वीटमध्ये लिहिले की, ज्या दिवशी रेल्वे गाड्या बंद केल्या त्या दिवसापासून प्रवासी कामगार घरी परत यावेत यासाठी राज्यांनी गाड्या 24 तासांसाठी सुरु कराव्यात अशी विनंती केली होती. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता आणि प्रवासी कामगार घरी पोहोचण्यासाठी रोडमॅपची विनंती केली. 

कायदा आणि सुव्यवस्था पाळा- गृहमंत्र्यांचे आवाहन

“मी सगळ्या कामगार आणि मजूर वर्गाला विनंती करतो की कायदा आणि सुव्यवस्था यांची बंधनं पाळा. तुम्ही सध्या आहात तिथेच थांबा, तुम्हा सगळ्यांना निवारा आणि अन्न मिळेल याची व्यवस्था केली जाईल. तुम्ही तुमचा संयम सोडू नका. तुम्हाला घरी जायचं आहे हे मी समजू शकतो. तूर्तास मुंबई सोडू नका.”

''आज जे वांद्रे मध्ये दिसले ते उद्या मुंबई मध्ये राहणारे कोकणातले लोक पण असु शकतात.. सरकार त्यांना आप आपल्या गावी जाऊ नका अस सांगत आहे पण मुंबई मधल्या 10 बाय 10 च्या खोलीत त्यांना धान्य तरी सरकार नी द्यावे नाहीतर त्यांचा ही असाच उद्रेक होईल!!! ''

बातम्या आणखी आहेत...