आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंचा थेट सवाल:लादेनला समुद्रात दफन केलं तसं याकूब मेमनला का केलं नाही? तेव्हा सरकार कोणाचं होतं?

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहशतवादी याकूब मेमनच्या कबरीवरुन आरोप करणाऱ्या भाजपला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केले तसे याकूब मेमनला समुद्रात दफन का नाही केले? दफन झाले तेव्हा सरकार कोणाचे होते? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित करत आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणे गरजेचे आहे, अशा शब्दांत फटकारले.

पुढे ते म्हणाले की, राजकारण व्हावे पण किती खालच्या पातळीवर जाऊन करावे याला मर्यादा असते. आज आरोप झाले ते खोटे आहेत. धार्मिक वाद निर्माण करायचे हे योग्य नाही. सत्य परिस्थिती समोर येणे गरजेचे आहे. जेव्हा दफन केले, तेव्हा मोठी सुरक्षा दिली होती. ओसामा बिन लादेनला समुद्रात दफन केले तसे का नाही केले? ते कब्रास्थान प्रायव्हेट आहे. दफन झाले तेव्हा सरकार कोणाचे होत नक्की? ही ट्रस्ट प्रायव्हेट आहे, हे त्यांना माहित नाही का? असे सवाल आदित्य ठाकरे यांनी केले.

निवडणुक जवळ आल्या आहेत, असे विषय पुढे येतायत. औरंगाबादवरून देखील असे विषय पुढे येत होते, शेवटी माध्यमातून सत्य समोर आले. आरोप करताना सत्य परिस्थिती काय हे पाहणे गरजेचे असते. बोलायला काहीही बोलू शकतात. 2015 मध्ये आम्ही सरकारमध्ये होतो, तेव्हा आमचे किती ऐकले जात होते, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

काय प्रकरण?
दहशतवादी याकूब मेमन याच्या कबरीच्या सुशोभीकरणावरून भाजपने ठाकरे सरकारविरोधात रान उठवले आहे. मुंबईतील साखळी बॉम्ब स्फोटातील दोषी याकूब मेमन याला फाशी देण्यात आली होती. याच याकूब मेमनचा मृतदेह दक्षिण मुंबईतील बडा कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आला होता. याकूब मेमन याच्या कबरीचे सुशोभीकरण करण्यात आल्याचे समोर आले. यावरून भाजपा आक्रमक झाली असून, भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीला लक्ष्य केले आहे. तर दुसरीकडे, मुंबई पोलिसांनी लगेच हालचाल करत या कबरीवरील एलईडी लाईट्स काढून टाकल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...