आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराठाकरे गटाचे नेते माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज तेलंगणाच्या दौऱ्यावर असताना तेलंगणाचे नेते के. टी. रामाराव यांची भेट घेतली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचे ते सुपुत्र आहे. त्यांच्याकडे राज्यातील महत्त्वाच्या खात्याचा पदभार देखील आहे. यामुळे आता आगामी काळातील नव्या युतीची ही नांदी आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळात अनेकांना पडला आहे.
शिवसेना फुटीनंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे हे अनेक पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत. यात त्यांनी बिहारमध्ये जात तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला चांगला मित्रपक्ष मिळावा, यासाठी आदित्य ठाकरेंकडून जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यानंतर आज के. टी. रामाराव यांची भेट घेतल्याने विरोधी पक्षांची मजबूत आघाडी बनवण्याचं काम आदित्य ठाकरे यांच्या कडून केले जात आहे.
राज्यात काही दिवसांत निवडणुका
आगामी वर्षभरात महाराष्ट्रात महानगरपालिका, जिल्हा परिषद, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे राज्यात नवे राजकीय समीकरण जुळवून घेण्यासाठी आदित्य ठाकरेंकडून प्रयत्न सुरू आहेत. मागील काही महिन्यांपासून आदित्य ठाकरेंनी राज्यभरातील अनेक मतदारसंघात दौरे केले असून तिथे अनेक छोट्या मोठ्या सभा घेत पक्ष संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
मराठवाड्यातील अनेक बडे नेते बीआरएसमध्ये
गेली अनेक दिवस केसीआर यांच्याकडून महाराष्ट्रात बीआरएस वाढविण्यासाठी प्रयतन सुरू आहेत. नांदेडमधील माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे, माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता विभागाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रदीप साळुंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, माजी आमदार कैलास पाटील यांचे सुपुत्र अभय पाटील यांनी बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. नांदेडमध्ये के.सी.आर यांनी सभा घेतल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरात ते सभा घेणार असल्याची माहिती आहे. त्यांना मिळणार पाठिंबा पाहता आदित्य ठाकरेंच्या तेलंगणा दौऱ्याल महत्व प्राप्त झाले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.