आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या वतीनं प्रसिद्ध झालेल्या जागतिक युवा नेत्यांच्या यादीत ठाकरेसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव आले आहे. यात भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांच्यासह देशभरातील सहा तरुण नेत्यांचा नावाचा समावेश आहे.
यंदा वर्ल्ड इकॉनॉमिक पह्रमने ‘यंग ग्लोबल लीडर्स क्लास’मध्ये 40 वर्षे वयाखालील सुमारे 100 जणांची निवड केली आहे. समाजात, देशात किंवा जगभरात सकारात्मक आणि चिरस्थायी बदलासाठी कार्य करणारे राजकीय नेते, कल्पक उद्योजक, क्रांतिकारी संशोधक, दूरदर्शी कार्यकर्ते अशांचा यादीत समावेश केला आहे. यादीत वेगवेगळ्या गटांतून सहा भारतीयांची निवड करण्यात आली आहे.
आम्ही सगळे आनंदी
खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंचे कौतुक केले. ते म्हणाले, जगातील 100 शक्तिशाली युवकांमध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव आले आहे. हा महाराष्ट्राचा आणि देशाचा गौरव आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आदित्य ठाकरे यांनी विविध क्षेत्रांमध्ये ठसा उमटवला आहे. त्यांच्या कार्याची ही जागतिक पोचपावती त्यांना मिळाली आहे. त्यांच्या नावाच्या समावेशामुळे आम्ही सगळे आनंदी आहोत.
यांच्याही नावाचा समावेेश
‘पब्लिक फिगर’मध्ये आदित्य ठाकरे, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई यांचा समावेश आहे. उद्योग गटात जिओ हॅप्टिक टेक्नॉलॉजीचे सहसंस्थापक आकृत वैश, टीव्हीएस मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, बायोझीन इंडियाचे कार्यकारी संचालक विबीन बी. जोसेफ, थिंक टँक गटात तन्वी रत्ना यांचे नाव आहे.
सर्वोत्कृष्ट लोकांचा समूह
वर्ल्ड इकॉनॉमिक पह्रम ही संस्था 2004 साली स्थापन झाली आहे. जगभरातील प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही फर्म काम करते. त्यासाठी सर्वोत्कृष्ट लोकांचा वैविध्यपूर्ण समूह तयार करण्यात आला आहे. यामध्ये 120 हून अधिक देशांतील 1400 सदस्य आणि माजी विद्यार्थी यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.