आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारावणराज्य चालवणारे अयोध्येला जात आहेत, अशा शब्दांमध्ये आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन टीका केली आहे. तसेच या महाराष्ट्रात आम्ही पुन्हा रामराज्य आणू, असा टोलाही त्यांनी शिवसेना-भाजप सरकारला लगावला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या खासदार, आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी यांच्यासह अयोध्येला जाणार आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर ठाकरे गटाकडून मोठ्या प्रमाणावर टीका केली जात आहेत.
हे आमचे ब्रीदवाक्य
आदित्य ठाकरे म्हणाले, आता कलियुग आहे. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत. पण नक्कीच या महाराष्ट्रात आम्ही रामराज्य आणू. 'रघुकुल रित सदा चली आये, प्राण जाये पर वचन न जाये' हे आमचे ब्रीदवाक्यच आहे. जी जी वचने आम्ही जनतेला दिली आहेत ती आम्ही पूर्ण करुन दाखवू. आणि सगळ्यात महत्त्वाचे वचन तर हेच आहे की, लोकशाहीसाठी, संविधानाच्या रक्षणासाठी वज्रमूठ प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत.
अयोध्या दौरा फक्त दिखावा
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील मुख्यमंत्री शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर टीका केली आहे. अंबादास दानवे म्हणाले, अयोध्या दौरा फक्त दिखावा असून, रामाचे विचार यांना कधीच झेपणार नाहीत. राम मंदिर व्हावे म्हणून 'पहिले मंदिर फिर सरकार' अशी उद्धव ठाकरेंनी घोषणा केली. पण आता न्यायालयाने निकाल दिला, राम मंदिर पण होत आहे. अशावेळी आयोध्येला जाणं मर्दुमकी आहे, असेही दानवे म्हणाले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.