आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणजे करप्टमॅन, माझ्याशी डिबेट करीत नाही, उलट ते शेतात तर कधी गुवाहाटीला पळतात - आदित्य ठाकरे

मुंबई25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सध्याचे मुख्यमंत्री म्हणजे करप्टमॅन आहेत. त्यांना मी चॅलेंज केले होते. मुंबईतील रस्ते घोटाळा, उद्योग पळवापळवी आणि दावोस दौऱ्यातील खर्च यावर त्यांनी त्यांच्या पूर्ण खात्यातील लोकांसह माझ्यासमोर बसावे; पण ते तरीही ते माझ्याशी डिबेट करीत नाही. कधी शेतात तर कधी गुवाहाटीला पळून जातात असा आरोप करुन राज्याचे माजी पर्यावरणमंत्री आणि युवासेना नेते आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडले.

सत्तेत बिल्डर काॅन्ट्रक्टर सरकार

आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या सहा ते सात महिन्यात मुंबई मनपाचे भ्रष्टाचार आम्ही उघड केले. राज्यपालांना या घोटाळ्यांची माहिती दिली आहे. प्रशासकांच्या अंधाधुंदी कारभारामुळे मुंबईत भ्रष्टाचार सुरू आहे. एका बाजूला चाळीस टक्के सरकार आणि राज्यातच बिल्डर काॅन्ट्र्क्टर सरकार बसले आहे, त्यामुळे मुंबईत सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार होत आहे. वर्क ऑर्डर जेव्हा दिल्या गेल्या तेव्हा चारशे किमीचे मुंबईत रस्ते होणार आहेत असे सांगितले गेले. यातील दहा रस्तेही आज सुरू झाले असे मला वाटत नाही.

कामे पावसाळ्यापूर्वी होणार नाही

आदित्य ठाकरे म्हणाले, ३१ मे च्या आधी अर्थात पावसळ्यापुर्वी पूर्ण होणार नाही. यात सर्वांनीच पत्र प्रशासकाला दिले. गद्दार गॅंग सोडून, पण कुठेही कारवाई झाल्याचे दिसत नाही. सीएम जे करप्टमॅन आहेत त्यांच्या जवळचे कुणीतरी या रॅकेटमध्ये आहेत. याच एका कंपनीमुळे मुंबईची कामे तीन आठवडे बंद होती. पावसाळ्यापूर्वी कुठेही कामे पूर्ण होणार नाही.

घोटाळ्याचा तपशील राज्यपालांना दिला

आदित्य ठाकरे म्हणाले, तीनशे रुपये प्रतिटनवरुन साधारणतः सहाशे रुपये प्रतिटन अशी स्टीलची किंमत वाढली. जो घोटाळा आहे तो एकाच काॅन्ट्रक्टर मित्रासाठी १६० कोटींची कामे २६३ कोटींमध्ये दिले आहेत. मुळातः हीच मागणी होती की, या घोटाळ्याचे डिटेल राज्यपालांना दिला व मागणी केली की, या सर्व घोटाळ्यांची चौकशी लोकायुक्तांकडून करावी.

पुणे मनपा नद्या नष्ट करतेय

आदित्य ठाकरे म्हणाले, पुण्यात वेताळटेकडी व रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा विषय आहे. तिथल्या नद्या मारण्याचे काम आणि टेकडी सपाट करण्याचे काम पुणे महापालिका करीत आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे मुख्यमंत्री म्हणजे करप्टमॅन आहेत. वेदांता फाॅक्सकाॅन ते दावोस करारापर्यंत झालेल्या खर्चाबाबत मी त्यांना सांगितले की, त्यांनी व त्यांच्या सर्व खात्यांनी माझ्यासोबत डिबेट करावी पण ते तसे करीत नाही. कधी शेतात पळून जातात तर कधी गुवाहाटीला पळून जातात. माझ्या प्रश्नांवर ते उत्तर देत नाहीत.