आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन वर्षात निवडणुका घेण्याची हिंमत दाखवा:आदित्य ठाकरे यांचे एकनाथ शिंदे यांना आव्हान; नागपूर, ठाण्यात रस्ते का नाहीत, असा सवाल

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन वर्षात गद्दारांनी महापालिका आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. तसेच इतर राज्याचे मुख्यमंत्री आपापल्या राज्याच्या विकासासाठी भेटी देतात, तर आपल्या मुख्यमंत्र्यांचे स्वतःचेच प्रश्न संपत नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले की, नवीन वर्षात तरी गद्दारांनी निवडणूका घेण्याची हिंमत दाखवावी. गेल्या वर्षात मंजूर झालेली कामे आयुक्त बदलू शकतात का? याविषयी आम्ही माहिती घेत आहोत. 7 हजार कोटींची जी कामे होत आहे. ती खरोखर 7 हजार कोटींची आहेत का? आणि खरच एवढ्या धडाक्याने ही कामे होत असतील तर आत्तापर्यंत कल्याण, डोंबिवली, ठाणे येथे रस्ते का झाले नाहीत. नागपूरमध्ये रस्ते का नाहीत, हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला असून मुंबईकरांचा पैसा लुटायचा जो प्रयत्न होत आहे तो आम्ही रोखू.

योगी यांचे कौतुक

आदित्य ठाकरे म्हणाले, योगी आदित्यनाथ यांचे मी कौतुक करतो. मागे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, अशोक गेहलोत येऊन गेले. आपापल्या राज्याच्या विकासासाठी हे मुख्यमंत्री वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातात. तिथल्या उद्योगांना ते भेटी देतात. आत्ताचे जे मुख्यमंत्री दिल्ली, गुवाहाटी याठिकाणी गेले, तेही केवळ स्वतःसाठी.

अनेक आश्वासने मिळाली

देवेन भारती यांच्या मुंबईतील नियुक्तीबाबत आदित्य ठाकरे म्हणाले, सीपी, आणि स्पेशल सीपी याबाबत आश्चर्य वाटण्याचे काही कारण नाही. कारण गेल्या 6 महिन्यांत जसे आपल्याकडे सीएम आणि सुपर सीएम आहेत. तसेच ते आहेत. सध्या केवळ खोक्यांवर काम सुरू आहे. गेल्या 6 महिन्यात केवळ आश्वासनांच्या पुढे हे मुख्यमंत्री गेलेले नाही. अनेक आश्वासने मिळाली मात्र ती पूर्ण झाली नाही. असाही टोला आदित्य ठाकरेंनी लगावला.

त्यांच्यावर दबाव

आदित्य ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्री आपापल्या राज्यासाठी काम करत आहेत. आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी बाहेर जात नाही. 40 आमदार 1 गद्दार येथून नेले आहे. मुंबई ही सांस्कृतिक राजधानी आहे. येथून कोणीही काही नेऊ शकत नाही. इतर राज्याचे मुख्यमंत्री मुंबईत येऊन आपापल्या राज्यासाठी भूमिका घेतात. विकासाच्या गोष्टी करतात. मात्र, आपल्या मुख्यमंत्र्यांचे स्वतःचेच प्रश्न संपत नाही. ते त्यांना दिल्लीला जाऊन मांडावे लागतात. विस्तार होत नाही. त्यांच्यावर दबाव आहे. त्यांचे असे अनेक प्रश्न आहेत.

बातम्या आणखी आहेत...