आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईला दिल्लीसमोर झुकवायचा डाव राज्यातील विद्यमान सरकारचे आहे. मंत्रिमंडळात घटनाबाह्य सरकार बसले, मी सांगतो थोड्या दिवसांचा खेळ आहे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच असे भाकित राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेना नेते आदित्य ठाकरेंनी व्यक्त केले.
मविआची बीकेसी मैदानात आज वज्रमूठ सभा सुरू आहे. या सभेला आदित्य ठाकरे यांनी संबोधित केले, त्यावेळी ते बोलत होते.
आम्ही महाराष्ट्र जोपासला
आदित्य ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र संयुक्त ज्यांच्यामुळे राहीला त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. संयुक्त महाराष्ट्राची आठवण महत्वाची आहे. ती ठेवूनच पुढे पाऊल टाकायला हवे. महाराष्ट्र दिन साजरा व्हावाच पण महाराष्ट्र सध्या अंधारात गेला आहे. मविआचे सरकार असताना आम्ही सर्वच एक टिम म्हणून काम करीत होतो. त्या अडीच वर्षांत आम्ही सर्वांनी महाराष्ट्राला सांभाळले, जोपासले.
थोड्याच दिवसांचा खेळ
आदित्य ठाकरे म्हणाले, अशा काळातही साडे सहा लाख कोटींचे उद्योग महाराष्ट्रात आणले. आमच्या काळात दंगलीही झाली नाही. मंत्रिमंडळात घटनाबाह्य सरकार बसले, मी सांगतो थोड्या दिवसांचा खेळ आहे हे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. इंच - इंच मुंबई जाणणारे कुणीही मंत्रिमंडळात नाही. महिलाही मंत्रिमंडळात नाही.
सरकार बिल्डरांचे झाले
आदित्य ठाकरे म्हणाले, सरकार बिल्डरांचे झाले. उद्धव ठाकरेंनी कर्जमुक्ती बंद करुन दाखवले. अजित पवार वित्तमंत्री असतानाही शेतकऱ्यांच्या हातात आपण साडे चौदा हजार कोटींची मदत देऊ शकलो. आता गारपीट होतेय, शेतकरी त्रस्त आहेत पण सरकार अवकाळी सत्तेत बसले.
वेदांता फाॅक्सकाॅन कुठे गेले
आदित्य ठाकरे म्हणाले, वेदांता फाॅक्सकाॅन कुठे गेले, टाटा एअरबस, बल्क ड्रग्ज पार्क गेला कुठे, चाळीस गद्दार गेले कुठे आता तुम्हाला समजेल की, महाराष्ट्राचे उद्योग कुठे गेले. महाराष्ट्र दिनासह गुजरातचाही स्थापना दिवस आहे, त्यांनाही शुभेच्छा पण त्यांच्याकडे एक मुख्यमंत्री आणि गुजरातला मदत करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुसरे असे दोन मुख्यमंत्री त्यांच्याकडे आहेत.
शिवसैनिकांचे मानले आभार
आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईचे आर्थिक नियोजन शिवसेनेने केले. सर्व शहरांना आणि गावांना आम्ही प्राधान्य दिले पण हे सरकार काहीच करीत नाही. मुंबईसाठी ज्या ठेवी आपण ठेवल्या त्या नष्ट करण्याचे काम हे सरकार करीत आहेत. मुंबईला दिल्लीसमोर झुकवायचा डाव राज्यातील विद्यमान सरकारचे आहे. एक वर्ष होत असतानाच न्यायाची, लोकशाहीची लढाई आम्ही लढत आहोत. ज्यांना सर्व काही दिले ते सोडून गेले पण शिवसैनिक आमच्यासोबत राहीले. एक मुलगा म्हणून मी तुमचे आभार मानतो.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.